पोलिसांनीच केली चोरी!

मध्य रेल्वेच्या अनेक जंक्शनपैकी एक असलेल्या तसेच ख्रिस्त पूर्व काळात सागरी मार्गाने वाहतूक चालत असल्याने  ऐतिहासिक नगरी म्हणून कल्याण प्रसिद्ध आहे. असे असताना कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील रस्ता चक्क पोलिसांनी चोरला आहे. त्यामुळे याची तक्रार कोणाकडे करावी असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत.

एरवी सामान्य माणसाने एखादी साधी चूक केली तर त्यावर कायद्याचा बडगा उगारणारे पोलिसच मुख्य रहदारीच्या रस्त्यावर बेकायदा पार्किंग करत आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन समोरील या रस्त्यावर सकाळ, दुपार आणि संध्याकाळी, रात्री मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पोलिस हा कायद्याचा रक्षक म्हणून सामन्यांच्या नजरेस असतो. पण पोलिसच  जर रहदारीच्या रस्त्यावर बेकायदा गाड्या (दुचाकी) पार्क करत असतील तर, वाहतूक नियम सामान्यांनी मोडल्यास पोलिसांना त्यांच्यावर  कारवाई  करण्याचा नैतिक  अधिकार  उरतो का, असा सवाल केला जात आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आलेली आहेत. स्टेशन परिसरातील पंडित नेहरू चौक परिसरातून या कामांची सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्टेशन परिसरातील कल्याण सत्र व दिवाणी न्यायालय, तहसीलदार कार्यालय परिसरातून स्टेशनकडे येणाऱ्या मुरबाड रोडला कायम वाहतूक कोंडी असते. स्टेशन परिसरातील सॅटीस त्यात भर घालत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरू झाल्यावर या कामाआड येणाऱ्या स्टेशन परिसरातील अनेक मुताऱ्या तोडून टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची कोंडी होत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या. त्यानंतर सॅटीस खाली तात्पुरती मुतारी बांधण्यात आलेली आहे. मुतारी समोरील रस्त्यावर पूर्वी रिक्शा, वा खासगी वाहनाने आलेल्यांना येथे उतरून स्टेशनला जाणे सोपे जायचे.
हे सुद्धा वाचा

शाहरुखला हवीय आलिया भट…आलियाची आतुरता वाढली…
राहुल गांधींनी पुन्हा दांडपट्टा फिरवला !
अदानी यांच्या गुंतवणुकीतला पैसा कुणाचा? राहुल गांधी यांचा मोदींना थेट सवाल

या मुतारी समोरचा स्टेशन परिसरातील रस्ता पूर्वी मोकळा होता. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून स्टेशनला जाणे सोपे होते. पण कल्याण  पश्चिममधील  हा रस्ता आपल्या दुचाकी पार्क करण्यासाठी पोलिसांनी बेकायदा बळकावला आहे. पोलिसांच्या गाड्यांवर ‘पोलीस’ असा स्टिकर असल्याने त्यावर ट्रॅफिक पोलीस कारवाई करत नाही. वास्तविक पाहता या बेकायदा पार्किंग जवळच महापालिकेने वाहनतळ (parking plaza) उभारला आहे. पण त्यात गाडी पार्क करायची असेल तर पैसे मोजावे लागतात, त्यामुळे  पोलिसांनी पैसे वाचवण्यासाठी कल्याण स्टेशन जवळील रस्ता आपल्या गाड्या पार्क करण्यासाठी चोरला आहे. दरम्यान, या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेचे उप-आयुक्त डॉ. विनय कुमार राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, ‘या प्रकरणाची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल,’ असे ‘लय भारी’ शी बोलताना सांगितले.

विवेक कांबळे

Recent Posts

पंतप्रधान पदासाठी माझी पसंती राहुल गांधी; मल्लिकार्जुन खरगे

देशामध्ये लोकसभा निवडणूक आज संपणार आहे, आज शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. तर बुधवारी…

9 mins ago

पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सरकारकडून यंत्रणेचा दुरुपयोग; संजय राऊत

पुण्यात अल्पवयीन आरोपीनं मद्यपान करुन सुसाट गाडी चालवत दोघांचे बळी घेतले. यानंतर याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना…

52 mins ago

दुष्काळग्रस्त जनतेला वा-यावर सोडून सरकार सुट्टीवर: नाना पटोले

संपूर्ण राज्य दुष्काळात (drought-hit people) होरपळत असून माता भगिणींना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे.…

1 hour ago

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती हर्षोउल्लासात साजरी

हिंदू धर्म रक्षक पु.अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar) ‌सार्वजनिक उत्सव समिती ‌तर्फे अहिल्यादेवी होळकरांची‌…

2 hours ago

मुंबईत ताडदेव परिसरात भीषण आग

मुंबईत आगीच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. डोंबिवली आणि धारावीतील आगीच्या घटना ताज्या असताना…

2 hours ago

कर्नाटक सेक्स टेप प्रकरण: प्रज्ज्वल रेवण्णाला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी

कर्नाटकमधील सेक्स टेप प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला (Prajwal Revanna) आज पोलिसांनी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून…

20 hours ago