31 C
Mumbai
Friday, September 1, 2023
घरमनोरंजनशाहरुखला हवीय आलिया भट...आलियाची आतुरता वाढली...

शाहरुखला हवीय आलिया भट…आलियाची आतुरता वाढली…

अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर नवा ट्रेंड सुरू झाला आहे. ट्रेलरच्या एका सीनमध्ये शाहरुखनं थेट आलिया भट्ट हवी अशी मागणी केली. शाहरुखच्या मागणीला आलियानं प्रतिसाद दिला असून, आपली प्रतिक्रिया इंस्टाग्राम स्टोरीजवर दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घालत आहे. चित्रपटातील व्हिएफएक्स, संगीत सर्वांच्या पसंतीस उतरले आहे. युट्युबवर दिवसभरात ‘जवान’च्या ट्रेलरला 20 लाखांहून अधिकांनी पसंती दिली. शाहरुखसह नयनतारा, विजय सेतुपती यांनीही चित्रपटाचा ट्रेलर इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. ट्रेलरमध्ये शाहरुख मुंबईतील मेट्रोट्रेन हायजॅक करतो. सिनेमात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करणारी नयनतारा शाहरुखला त्याची मागणी विचारते. नंतरच्या प्रश्नावर शाहरुख मिश्किलीने उत्तर देत मला आलिया भट हवी असल्याचं सांगतो. ट्रेलर प्रदर्शित होताच गुरुवारी रात्री उशिरानं आलिया भट्टनं शाहरुखच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली. ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर संपूर्ण जगाला शाहरुख खान हवाय. ‘जवान’ चित्रपट पाहण्यासाठी सात सप्टेंबर पर्यंत वाटणं पाहणे शक्य नाहीये.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिंग राहणाऱ्या जवानचा ट्रेलर अखेर गुरुवारी बारा वाजता प्रदर्शित करण्यात आला. धमाकेदार ॲक्शन सिक्वेन्स, उच्च दर्जाचे व्हिएफएक्समुळे 40 मिनिटातच पंधरा लाखाहून अधिक प्रेक्षकांनी युट्युबवर ट्रेलर पाहिला. शाहरुख आणि दक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा यांचा ‘जवान’ चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

हे ही वाचा 

नयनताराने चाहत्यांसाठी आणली आहे गोड बातमी…

बदला घेण्यासाठी मी शाहरुख सोबत काम केलं, ‘जवान’ मधील या कलाकाराचा गौप्यस्फोट

सनी लिओनीनेही साजरा केला रक्षाबंधन! पहा, कोणाला बांधली राखी?

या सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोणने स्पेशल अपिअरन्स दिला आहे. ट्रेलरमध्ये काही सेकंदाच्या सीनमध्ये दीपिका पूर्णपणे भाव खाऊन जाते. नयनताराने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बजावली आहे. सिनेमात अभिनेत्री प्रियमनी, सानिया मल्होत्रा, गिरीजा ओक-गोडबोले ॲक्शनमॉडमध्ये दिसून येत आहेत. ट्रेलरमध्ये दीपिकापादुकोण पासून नयनतारा सशक्त महिलांच्या भूमिकेत वावरत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी