महाराष्ट्र

राज्यात पावसाचा कहर, बळीराजा चिंताक्रांत

टीम लय भारी

मुंबई: आषाढी एकादशीला राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. चार दिवस बरसलेल्या पावसामुळे जनजीवन कोलमडून गेले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी विजेचे खांब देखील उन्मळून पडले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पावसामुळे दळणवळण खंडीत झाले आहे.

मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, जळगाव जिल्हयांना पावसाने झोडपून काढले आहे. अनेक जिल्हयात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.राज्यातील नदया, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पुलांवरुन पाणी वाहत आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा चिंताक्रांत झाला आहे. सततच्या पावसामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.

रायगड, रत्नागिरी, नंदूबार, गडचिरोली, कोल्हापूरच्या अनेक भागात भात शेती पाण्यात गेली आहे. सांगली, सातारा, नाशिकमध्ये द्राक्षांचे मळे पाण्यात गेले आहे. अनेक ठिकाणी बाजरी, सोयाबिन पाण्यात गेल्यामुळे कुजून गेले आहे. परभणी जिंतूरमध्ये कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. तीन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. शासनाने दुबार पेरणीसाठी विनामूल्य बियाणे उपलब्ध करुन देण्याबरोबरच आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

हे सुध्दा वाचा:

रूपाली केळस्कर

Recent Posts

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

2 mins ago

अखेर हेमंत गोडसे यांना नाशिकमधून महायुतीची उमेदवारी

शिवसेनेकडून हेमंत गोडसे (Hemant Godse candidature ) यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाशिकचा…

20 mins ago

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा; नरेन्द्र मोदी

दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक…

1 hour ago

विरोधकांच्या चुकीच्या मुद्द्यांना प्रभावीपणे उत्तर द्यावे:डॉ.भारती पवार

मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताची गगनाला गवसणारी प्रगती झाली असून आज जगभरात भारताचे मान उंचावली आहे…

1 hour ago

राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी भाजपाला सत्तेतून तडीपार करा: डॉ. भालचंद्र मुणगेकर

लोकसभेची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी असून मोदी पुन्हा सत्तेत आले तर राज्यघटना बदलून…

2 hours ago

अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर कडक कारवाई करा: प्रगती अहिर

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना ( Prajwal Revanna ) याने अनेक…

3 hours ago