महाराष्ट्र

राज ठाकरेंनी पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी केली; महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्या

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात दुसरे संकट निर्माण झाले आहे ते म्हणजे लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह आणखी पाच मागण्या केल्या आहेत.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन पानी पत्रे लिहिले आहे. या पत्रातून राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लसींचा निर्माण झालेला तुटवडा याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. तसेच या पत्रातून पंतप्रधानांकडे पाच मागण्याही करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राची स्थिती सर्वात बिकट

गेल्यावर्षी कोविड-१९ ची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिका रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात देखील झाले आहेत. आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असातना महाराष्ट्रातली स्थिती सर्वात बिकट झाली आहे, असे राज यांनी पत्रात म्हटले आहे.

राज यांचा मोदींना सवाल

कोविडच्या पहिल्या लाटेनंतर त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी यामुळे महाराष्ट्राचे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभर ही पडलेले आपण आजही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो? असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना केला आहे.

सर्व वयोगटातील लोकांचे लसीकरण करा

कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर १०० टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे आणि कळीची आहे. म्हणूनच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्टे ठेवून, राज्यातील सर्व वयोगटातील १०० टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ हवीच, असे ही त्यांनी म्हटले आहे.

कोविड रोखण्यासाठी प्रत्येक राज्यांचे धोरण असावे

कोरोनामुळे राज्यांवर वेगवेगळे परिणाम झाले आहेत. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्यांना केवळ परवानगीच नाही, तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, त्यातून एकमेकांना शिकण्याची संधी ही मिळेल, असे राज यांनी म्हटले आहे.

राज यांच्या पाच मागण्या

  • महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्याव्या.
  • राज्यातल्या खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात.
  • ‘सिरम’ला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी.
  • लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हॉफकिन व हिंदुस्तान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी.
  • कोव्हिड-१९ रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.

Rasika Jadhav

Recent Posts

भुजबळांकडून ‘तुतारी’चा प्रचार, मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; आमदार कांदेंची मागणी

सध्या लोकसभा निवडणुकांची  धामधूम सुरु असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी…

12 hours ago

अक्षय तृतीयेच्या निमीत्ताने बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya ) सण शुक्रवारी (दि. १०) उत्सहात…

12 hours ago

तरुणाचा भररस्त्यात कोयत्याने वार करत निर्घृण खून

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यात तरुणाचा कोयत्याने वार करत आणि बंदुकीतून गोळ्या झाडत…

12 hours ago

संजय राऊत यांच्या बेजबाबदार वादग्रस्त वक्तव्या विरोधात तक्रार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत…

13 hours ago

उमेश कामत आणि प्रिया बापटसोबत ‘जर तरची गोष्ट’ रंगणार

सुपरस्टार उमेश कामत आणि प्रिया बापट (Umesh Kamat and Priya Bapat) यांची प्रमुख भूमिका असलेले…

13 hours ago

नाशिक मधील निओमेट्रोचा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत संपली

वेगाने वाढणाऱ्या नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

13 hours ago