महाराष्ट्र

Raj Thackeray : स्वतंत्र‍ व‍िदर्भाच्या मुद्यावर जनमत घ्या, राज ठाकरेंचा नागपुरकरांना सल्ला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे दौरे सुरू आहेत. त्यांनी पालिका निवडणुकांसाठी मोर्च बांधणी सुरू आहे. स्वतंत्र‍ व‍िदर्भाच्या मुद्यावर जनमत घ्या, असा राज ठाकरेंनी नागपुरकरांना सल्ला दिला. तसेच आयोध्या दौऱ्यावर रामाने बोलावले की मी जाईन असे सांगितले. हिंदूत्त्वाच्या मुद्यावर देखील त्यांनी भाष्य केले. आगामी निवडणुकीमध्ये नगरसेवकांचे प्रमाण वाढलेले दिसेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. महानगर पालिका निवडणुकीमध्ये चारचा प्रभाग तीनचा प्रभाग हे लोकशाहीला घातक आहे.

मतदारांनी चार नगरसेवक कसे लक्षात ठेवावे. राजकीय पक्षांच्या हितासाठी ते सातत्याने बदल करतात. यासाठी आम्ही कोर्टात देखील गेलो होतो. मुळात निवडणुकीची पुर्वीची पद्धत योग्य होती. ज्याला बहूमत त्याचा सरपंच, महापौर झाला    पाहिजे. प्रभाग रचना बदलून एकमेकांना हाताशी धरुन महानगर पालिका ओरबाडतात. असे जगात कुठे होत नाही. ही थेरं महाराष्ट्रात आहेत. निवडणूक आयोग यावर काय करते. जबाबदारीने निवडणुका लढवणे गरजे आहे. अशा पद्धतीने नगरसेवक गब्बर होती. दोनचा चारचा प्रभाग ही पद्धत नको,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकांना फुकटात काहीच देऊ नये. लोकांना योग्य दरात योग्य वेळी सुव‍िधा हव्या असतात. लोकांची तशी मागणी असते. कोणी कोणाला फूकट काहीच देत नाही सरकार लोकांकडून टॅक्स घेते. मोफत घरे देऊ नयेत. आशा योजना आणून राजकारणी स्व:च्या क्षणीक स्वार्थसाठी आपले नुकसान करतात.

हे सुद्धा वाचा

Raj Thackeray : विलासरावांच्या दुर्लक्षामुळे बीएमडब्ल्यूचा प्रकल्प तामिळनाडूला गेला, आता फॉक्सॉन गुजरातला का गेला याची चौकशी करा- राज ठाकरे

Nilu Phule : सुपरस्टार निळू फुले यांचा बायोपिक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर

Taiwan : सावधान ! ‘या’ देशाला पुन्हा त्सुनामीचा धोका

पावसाने नुकसान झाले अजून, नुकसान भरपाई झालेली नाही यावर उत्तर देतांना ते म्हणाले,  ते मामांना विचारा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरचे आहेत. ते आले की, त्यांनाच हे विचारा. यावेळी त्यांनी सत्तांतराच्या नाटयावर जोरदार टीका केली. हिंदूत्त्वाचा मुद्दा देखील त्यांनी यावेळी लावून धरला. प्रभाग रचनेवरून त्यांनी निवडणूक आयोगावर  ताशेरे ओढले. मग निवडणूक आयोगाचे काय काम ? ते काय फक्त कार्ड काढणार ? असा खरमरीत सवाल राज ठाकरेंनी यावेळी विचारला.

रूपाली केळस्कर

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

10 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

10 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

10 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

11 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

13 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

13 hours ago