महाराष्ट्र

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी भाषेचे अध्यासन केंद्र व्हावे. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली. सत्यजित तांबे यांनी सोशल मीडिया वर पोस्ट शेअर केली आहे. (Satyajit Tambe’s request to CM Eknath Shinde, Marathi Language expansion)

यामध्ये त्यांनी म्हटले, ‘देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी भाषेचे अध्यासन केंद्र व्हावे हे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख साहेब यांचं स्वप्न होतं, त्यासाठी त्यांनी 2007-2008 साली 1 कोटी रुपयांचा निधीही जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला दिला होता. मात्र, 18 वर्षानंतरही हे अध्यासन केंद्र सुरू झालेले नाही.’ (Satyajit Tambe’s request to CM Eknath Shinde,Marathi Language expansion)

जयंत पाटील यांचा सरकारवर निशाणा, जाहिरातबाजीवर ४०० कोटी; अन् शेतकऱ्यांना…

‘जगभरातील अनेक विद्यार्थी विविध भाषांचे ज्ञान घेण्यासाठी येतात. या विद्यापीठात मराठी भाषेचे अध्यासन केंद्र सुरू झाल्यास मराठी भाषेतील ज्ञानाचे भांडार संपूर्ण जगासाठी खुले होईल. यादृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने जवाहरलाल नेहरू विद्यापीठास मार्च महिन्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र, अजूनही हे अध्यासन केंद सुरू झाले नसल्याने याबाबत पाठपुरावा करून कामास गती द्यावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांना केली.’ (Satyajit Tambe’s request to CM Eknath Shinde,Marathi Language expansion)

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये 6500 रुपयांची वाढ, CM एकनाथ शिंदे यांची घोषणा

याचबरोबर, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे मराठी भाषेचे व इतिहासाचे अध्यासन केंद्र दसऱ्याच्या पूर्वी सुरू करून मराठी भाषेचे सीमोल्लंघन करावे.’ अशी विनंती केली. (Satyajit Tambe’s request to CM Eknath Shinde,Marathi Language expansion)

काजल चोपडे

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

8 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

9 hours ago