महाराष्ट्र

सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या नावे बनावट अध्यक्ष व सेक्रेटरींनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा

टीम लय भारी
पालघर : जिल्ह्यातील सेवा आश्रम शिक्षण संस्था (Sewa Ashram Education Institute) मुरबे येथील संस्थेचे बनावट लेटर पॅड आणि अध्यक्ष व सेक्रेटरी यांचा बनावट शिक्का बनवून लोकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तसेच सेवा आश्रम शिक्षण संस्थेची बदनामी केल्याप्रकरणी दोघांवर तक्रार दाखल करण्याची विनंती शिक्षण संस्थेचे फिट पर्सन यांनी बोईसर पोलीस ठाण्यात केली आहे. तसेच फसवणूक झालेल्या एका व्यक्तीने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देखील दाखल केला आहे.
संस्थेचे लेटर पॅड आणि अध्यक्ष व सेक्रेटरी यांचा बनावट शिक्का बनवून लोकांना सहाय्यक शिक्षक पदाचे पत्र बनवून लोकांकडून लाखो रुपये घेऊन  फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षण संस्थेचे फिट पर्सन समाधान सुर्यवंशी, विलास गणपत पाटील, प्रकाश शहादू बावीस्कर यांनी बोईसर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात यावी असा विनंती अर्ज दिला आहे.
संस्थेचे बनावट अध्यक्ष सुधाकर काशिनाथ फातरपेकर स्वतःला सेंट्रल विझिलन्स कमिशन अधिकारी सांगत. तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ही माझी विद्यार्थिनी आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी संगीता भागवत यांच्या नावाचा गैरवापर करत दुसऱ्याच कोणी महिलेशी संगीता भागवत यांच्या नावाने फोन लावून फसवणूक झालेल्या व्यक्तींना बोलायला देत असल्याची माहिती फसवणूक झालेल्या व्यक्तींनी दिली आहे.
सेवा आश्रम विद्यालय बोईसर येथे येऊन सुधाकर फातरपेकर यांनी मुख्याध्यापक रवींद्र पिंपळे यांना दमदाटी करीत आमच्या ह्या लोकांना कामावर घ्या, अन्यथा तुमची संस्था बंद करून टाकेल अशी धमकी देण्यात येत असल्याची माहिती सेवा आश्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापकांकडून देण्यात आली आहे. तर बनावट सेक्रेटरी कडू छतरु चव्हाण हे सेवा आश्रम विद्यालय बोईसर येथील मुख्याध्यापक असल्याचे लोकांना भासवत बनावट हजेरी मस्टर तयार करून रजिस्टरमध्ये ४० लोकांची सह्या घेऊन मस्टर तयार केले असल्याची माहिती फसवणूक झालेल्या व्यक्तींनी दिली आहे.
दरम्यान, सुधाकर काशिनाथ फातरपेकर हे स्वतःला सेवा आश्रम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि कडू चव्हाण हे स्वतःला सेवा आश्रम शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी असल्याचे लोकांना सांगत आणि त्यांच्याकडून लाखो रुपये घेत. असे करत या दोघांनी लोकांची चार ते पाच कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.
फसवणूक झालेल्या व्यक्तींमध्ये बोईसर येथील एक तर बदलापूर येथील पाच आणि आणखी सात ते आठ लोक यांना घाबरून समोर येत नसल्याची एकाने माहिती दिली आहे. बदलापूर येथील युवक याने आपली ऑटो रिक्षा विकून बायकोच्या अंगावरील सोने आणि मंगळसूत्र विकून सुधाकर काशिनाथ फातरपेकर यांच्या खात्यात आणि आणि त्यांच्या पुतण्या कल्पेश प्रभाकर फातरपेकर यांच्या खात्यात आठ लाख रुपये NEFT द्वारे दिले असल्याचे सर्व ऑनलाईन व्यवहार केल्याचे कागदपत्रे पोलिसांसमोर सादर केले आहेत.
तसेच बोईसर येथील एका व्यक्तीकडून पाच लाख रुपये तर संगमनेर येथील आंधळे सर यांच्याकडून नवरा बायको यांना नोकरी लावण्याचे अमिष दाखवत १५ लाख रुपये घेतले आहेत. नंदुरबार येथील जोशी यांच्याकडून १५ लाख, तर निलेश पाटील चाळीसगाव यांच्याकडून १५ लाख रुपये सेवा आश्रम शिक्षण संस्थेमध्ये नोकरीचे अमिष दाखवत करोडो रुपये जमा केल्याचे समोर आले आहे.
संगमनेरचे आंधळे सर हे मोठे लेखक असून त्यांचे बालभारतीमध्ये नाव आहे. अशा लोकांना या बनावट अध्यक्ष सुधाकर फातरपेकर यांनी फसविले आहे. नोकरीबद्दल विचारले की सुधाकर फातरपेकर हे पालघर येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात बोलावून त्यांची भेट घालून देऊन तुमचे तुमचे काम लवकरच होईल असे सांगत. आम्ही संस्था ताब्यात घेण्यासाठी सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांना ४० लाख रुपये दिले असल्याचे सुधाकर यांनी सांगितले. अशा प्रकारे ते खात्री देत असत. अशी माहिती संगमनेरचे प्रसिद्ध लेखक आंधळे सर यांनी दिली आहे.
या रॅकेटमध्ये कोणकोणत्या अधिकाऱ्यांचे नाव पुढे येते हे चौकशी नंतरच समोर येऊ शकते. यासाठी लवकरात लवकर गुन्हा दाखल करून चौकशी करून आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे सेवा आश्रम शिक्षण संस्थेचे फिट पर्सन समाधान सुर्यवंशी यांनी मागणी केली आहे.
हे सुद्धा वाचा :

MPSC अंतर्गत होणार ४३३ पदांची भरती

पूनम खडताळे

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

5 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

5 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

5 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

6 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

7 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

7 hours ago