महाराष्ट्र

मोंदीच्या पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांनी भाषणात दोन मुद्दयांवर वेधले लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पुण्यात लोकमान्य टिकळ पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला शरद पवार उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात शंका कुशंकांना पेव फुटले होते. मात्र तरी देखील आज पवारांनी या सोहळ्याला उपस्थिती दाखविली. या सोहळ्या पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. दरम्यान पवारांनी आपल्या भाषणात दोन मुद्द्यांवर भर देत काही सुचक विधाने केली.

या कार्यक्रमाच्या सोहळ्यादरम्यान बोलताना पवारांनी पुण्याचा गौरव करताना शिवरायांनी स्वराज्याची स्थापणा याच पुणे जिल्ह्यातून केल्याचे सांगितले. शिवरायांचे बालपण पुण्यात गेले. असे सांगत असताना त्यांनी इतर संस्थाने ही त्या त्या राजांच्या नावाने प्रसिध्दीस आली मात्र शिवरायांचे स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य होते. ते रयतेचे राज्य होते असे म्हणत शिवरायांचे राज्य हे भोसल्यांचे राज्य नव्हते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

याचवेळी बोलताना पवारांनी आणखी एका मुद्द्याला हात घातला. शिवरायांचा पराक्रम सांगत असताना पवार म्हणाले, अलिकडच्या काळात जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला. त्याची मोठी चर्चा झाली. पण पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवरायांनी केला होता असे सांगत त्यांनी शिवकाळातील घटनेचा दाखला दिला. शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला होता. तेव्हा शिवरायांनी लाल महालावर हल्ला करुन पहिला सर्जिकल स्ट्राईक केल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. शरद पवारांनी दिलेल्या या दाखल्यावर खुद्द पंतप्रधानांनी देखील टाळ्या वाजवत त्याला दाद दिली.

हे सुद्धा वाचा

अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेल्या महिलेबाबत असे घडले की, तिने तहसीलदारांकडेच आत्महत्येची परवानगी मागितली

गुजरात नरसंहाराने भाजपाला केंद्रात बसवले, तेच मॉडेल ईशान्य भारतात आयात केले – प्रकाश आंबेडकर

मणिपूर महिला अत्याचार प्रकरण : सरन्यायाधीशांनी विचारले 14 दिवस पोलिसांनी काहीच का केले नाही?  

यावेळी बोलताना पवारांनी टिळकांच्या स्वातंत्रलढ्यातील योगदानाचा देखील आढावा घेतला. टिळकांनी सुरु केलेल्या शिवजयंती, गणेशोत्सवाचे स्वातंत्र्य लढ्यातील लोकजागृतीसाठीचे महत्व सांगतानाच त्यांनी त्यांच्या जाज्ज्वल्य पत्रकारितेचा देखील उल्लेख केला. टिळकांनी मराठीतील केसरी वर्तमानपत्र आणि इंग्रजीतील मराठा साप्ताहीकातून निर्भिडपणे स्वातंत्र्याविषयी मांडलेल्या भूमिकेचा इतिहास त्यांनी यावेळी सांगितला. पुढे पंतप्रधान मोदी यांनी देखील आपल्या भाषणात पवारांच्या या विधानाचा उल्लेख करत टिळकांच्या पत्रकारितेचा गौरव केला.

प्रदीप माळी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago