28 C
Mumbai
Tuesday, September 26, 2023
घरराजकीयगुजरात नरसंहाराने भाजपाला केंद्रात बसवले, तेच मॉडेल ईशान्य भारतात आयात केले -...

गुजरात नरसंहाराने भाजपाला केंद्रात बसवले, तेच मॉडेल ईशान्य भारतात आयात केले – प्रकाश आंबेडकर

मणिपूर जळत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत संसदेत बोलत नसल्याने कॉंग्रेससह देशातील विरोधक केंद्रातील सरकार विरोधात एकवटले आहेत. विरोधी बाकावर बसणाऱ्या 22 खासदारांनी दोन दिवस मणिपूरमध्ये मुक्काम करून तिथली भयानक स्थिती देशासमोर आणली आहे. असे असताना आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हेही मोदी सरकार विरोधात लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. द्वेष आणि मृत्यूच्या व्यापाऱ्याने (The Merchant of Death and Hate) जातीय संहाराचे (ethnic cleansing) 2002 चे गुजरात नरसंहार मॉडेल ज्याने भाजपा-आरएसएसला केंद्रात सत्तेत बसवले तेच मॉडेल ईशान्य भारतात आयात केले आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार बघितला तर लक्षात येते की गुजरात मधील २००२ हिंसाचाराशी बरेच साधर्म्य आहे. जसे की राज्य प्रायोजित हिंसाचार, संघर्ष जास्त काळ सुरू ठेवणे, नरसंहार, महिलांवर बीभत्स अत्याचार करणे, विटंबना करणे असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

‘अच्छे दिनच्या नावाखाली भाजपने कायम धार्मिक ध्रुवीकरण आणि ब्राह्मणवादाला खतपाणी घालण्याचे काम केले आहे, ज्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक समूहाच्या विरोधात द्वेषातून केले जाणारे गुन्हे (hate-crimes) वाढले आहेत ‘ असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. The Merchant of Death and Hate ने जातीय संहाराचे (ethnic cleansing) 2002 चे गुजरात नरसंहार मॉडेल ज्याने भाजपा-आरएसएसला केंद्रात सत्तेत बसवले तेच मॉडेल ईशान्य भारतात आयात केले आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार बघितला तर लक्षात येते की गुजरात मधील २००२ हिंसाचाराशी बरेच साधर्म्य आहे. जसे की राज्य प्रायोजित हिंसाचार, संघर्ष जास्त काळ सुरू ठेवणे, नरसंहार, महिलांवर बीभत्स अत्याचार करणे, विटंबना करणे असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा

‘आरपीएफ’च्या व्हॉट्सॲप ग्रुपने महिला प्रवाशांचा प्रवास झाला सुरक्षित
मनोहर भिडे हा खोटारडा आहे – डॉ. आव्हाडांनी नोंदविली पोलीस ठाण्यात तक्रार
संभाजी भिडेला पाठीशी घालणाऱ्याचा शोध घ्या- बाळासाहेब थोरात

द्वेष आणि जातीवादाची जी दुकाने आहे आणि त्या व्यापाराचा जो सर्वात मोठा ठेकेदार दिल्लीत बसून स्वत:ला प्रधान सेवक म्हणवतो त्यांना मी सांगू इच्छितो की 2002 गुजरात हिंसाचार घडल्यावर सोनिया गांधी यांनी तुम्हाला जे नाव दिले होते ते जाता जाता खरे करू नका. एक धर्मनिरपेक्ष संघराज्य म्हणून भारताच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे, अशीही भीती प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी