29 C
Mumbai
Monday, July 31, 2023
घरराष्ट्रीयमणिपूर महिला अत्याचार प्रकरण : सरन्यायाधीशांनी विचारले 14 दिवस पोलिसांनी काहीच का...

मणिपूर महिला अत्याचार प्रकरण : सरन्यायाधीशांनी विचारले 14 दिवस पोलिसांनी काहीच का केले नाही?

मणिपूरमधील महिलांच्या नग्न धिंडीच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आज (दि.31) रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. न्यायालयाने म्हटले की, मणिपूरच्या व्हिडीओमधील महिलांना पोलिसांनी झुंडीच्या हाती सोपविले, हे भयावह आहे.

सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी सरकारला प्रश्न केला की, 4 मे च्या घटनेवर पोलिसांनी 18 मे रोजी एफआयआर दाखल केला. 14 दिवस काहीच का नाही केले ? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलांबाबतची घटना समोर आली. यामध्ये महिलांची नग्न धिंड काढली. किमान दोन महिलांवर बलात्कार केला. तेव्हा पोलिस काय करत होते? सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी विचारले, समजा महिलांवरील अत्याचाराचे 1000 गुन्हे दाखल आहेत, तर सीबीआय सगळ्यांचा तपास करु शकेल? सरन्यायाधीशांच्या प्रश्नांना उत्तर देताना सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, या प्रकरणाच्या तपासी पथकात सीबीआयकडून एक उच्च महिला अधिकाऱ्याचा समावेश असेल. तर सरकारतर्फे बाजू मांडताना अटॉर्नी जनरल आर. व्यंकटरमनी म्हणाले उद्या (दि. १) रोजी या या प्रकरणाशी संबंधित वस्तुस्थितीसह माहिती देऊ.

सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी सॉलिसिटर जनरलना विचारले की, मणिपूरमध्ये किती झिरो एफआयआर नोंदविले आहेत याची माहिती आम्हाला द्या. तसेच या प्रकरणी काय कारवाई केली. किती जणांना अटक केली? असे सवाल देखील त्यांनी उपस्थित केले. सरन्यायाधीश म्हणाले, या प्रकरणी आम्ही मंगळवार (1 ऑगस्ट) रोजी सुनावणीवेळी याबाबत ऐकू, बुधवारपासून कलम 370 प्रकरणी सुनावणी होणार आहे, त्यामुळे मणिपूरबाबत उद्याच सुनावणी करावी लागणार असल्याचे देखील सरन्यायाधीशांनी सांगितले. यावर तुषार मेहता यांनी उद्या सकाळपर्यंत एफआयआरबाबतची माहिती मिळवणे कठीण असल्याचे सांगितले.

सरन्यायाधीश चंद्रचुड म्हणाले, सवाल असा आहे की, पीडित महिलांचे जबाब कोण नोंदविणार ? 19 वर्षीय पीडित महिला जी सध्या मदत शिबिरात आहे, तिच्या वडिलांची, भावाची हत्या झाल्याची भिती तिला आहे, मग अशावेळी न्यायप्रक्रीया तिच्यापर्यंत पोहचेल का?, सरन्यायाधीश म्हणाले, याचिकाकर्त्यांनी एसआयटीबाबत देखील नावे सुचविली आहेत. याबाबत त्यांनी सरकारकडे देखील उत्तर मागितले आहे, आणि एसआयटीसाठी नावे सुचविण्यास सांगितले आहे. सरन्यायाधीश पुढे म्हणाले, एकतर आम्ही स्वत:हून एक समिती स्थापन करु या समितीत एक माजी महिला न्यायाधीश देखील असतील.

हे सुद्धा वाचा

मनोहर भिडे हा खोटारडा आहे – डॉ. आव्हाडांनी नोंदविली पोलीस ठाण्यात तक्रार

लोकसभा निवडणूक भाजपला जड जाणार; एकनाथ शिंदे, अजित पवारांना धक्का देणारा सर्वे

‘आरपीएफ’च्या व्हॉट्सॲप ग्रुपने महिला प्रवाशांचा प्रवास झाला सुरक्षित

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, मणिपूरमधील व्हिडिओमध्ये दाखवलेल्या महिलांना पोलिसांनी दंगलखोर जमावाच्या स्वाधीन केले असल्याचे जबाब आहेत, हे भयावह आहे. निर्भया प्रकरणाचा संदर्भ देताना, चंद्रचुड म्हणाले की ही निर्भया प्रकरणासारखी परिस्थिती नव्हती ज्यामध्ये एक बलात्कार झाला होता, तो भयानक होता ते प्रकरण वेगळे होते. मणिपूरमध्ये पद्धतशीरपणे केलेल्या हिंसाचाराचा सामना करत आहोत, ज्याला इंडियन पिनल कोड स्वतंत्र गुन्हा मानते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी