महाराष्ट्र

एकच धून सहा जून! रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांची QR कोडच्या माध्यमातून गैरसोय टळणार

टीम लय भारी

अलिबाग : दरवर्षी शिवभक्तांना ६ जूनची आतुरता असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही अखिल भारतीय शिवराज्याभिषेक (Shiv Rajyabhishek) महोत्सव समितीच्या वतीने दुर्गराज रायगडावर ५ व ६ जून २०२२ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे. (Shiv Rajyabhishek ceremony will be held on 6th June at Raigad)

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक शिवभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी QR कोडच्या माध्यमातून माहिती देण्यात येत आहे. दि ५ जून व दि ६ जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेषा, गडावर जाण्याचे व उतरण्याचे प्रमुख मार्ग, अन्नछत्र, स्वच्छतागृह, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा, महिलांसाठी करण्यात आलेली स्वंतंत्र व्यवस्था, गडाच्या पायथ्याला असलेली वाहनतळ, पायथ्याचे अन्नछत्र, याची सर्व माहीती, नकाशे, #QR कोड च्या माध्यमातून सर्व शिवभक्तांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन्ही वर्षी मी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शिवराज्याभिषेक सोहळा घरीच साजरा केला होता.पण यावर्षी शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दुर्गराज रायगडावर मोठ्या जल्लोषात एकत्र साजरा करुया, असे आवाहन युवराज संभाजी छत्रपती महाराज यांनी दिले आहे.

अशारीतीने राज्याभिषेक सोहळा पार पडणार

दिनांक ५ जून २०२२

  • दु. ४.००वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व शिवभक्तांच्या समवेत पायी गड चालण्यास प्रारंभ स्थळ: चित्त दरवाजा
  • सायं ५.०० वा. गडपूजन (२१ गावातील सरपंच व पंचक्रोशीतील गावक-यांच्या उपस्थितीत ) स्थळः नगारखाना
  • सायं ५.०० वा. धार तलवारीची…युद्धकला महाराष्ट्राची, स्थळः होळीचा माळ
  • सायं ६.०० वा. ‘गतवैभव रायगडाचे, कार्य रायगड विकास प्रधिकरणाचे’ या विषयावर विस्तृत सादरीकरण स्थळ : हत्तीखाना
  • सायं ७.०० वा. जागर शिवशाहिरांचा… स्वराज्याच्या इतिहासाचा… स्थळ:राजसदर
  • रात्री ९.०० वा. गडदेवता शिरकाई देवी चा गोंधळ, स्थळ: शिरकाई मंदिर
  • रात्री ९.३० वा. जगदीश्वराचे वारकरी संप्रदायाकडून किर्तन, जागर व काकड आरती स्थळः जगदीश्वर मंदिर रात्री ९.०० वा. अन्नछत्र स्थळ: जिल्हापरिषद धर्मशाळा आणि पायथा

दिनांक ६ जून २०२२

  • स. ६.०० वा. ध्वजपूजन, ध्वजारोहन व जयघोष रणवाद्यांचा, स्थळ : नगारखाना
  • स. ६.५० वा. शाहिरी कार्यक्रम स्थळ:राजसदर स. ९.३० वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन, स्थळ:राजसदर
  • स. ९.५० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व मिरवणुकीने राजसदरेवर आगमन
  • स. १०.१० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक
  • स. १०.२० वा. मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक स. १०.२५ वा. प्रास्ताविक: अध्यक्ष अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती
  • स. १०.३० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवभक्तांना मार्गदर्शन
  • स. १०.३० वा. ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ शिवराज्याभिषेक मुख्य पालखी सोहळ्यास प्रारंभ
  • दु. १२.०० वा. जगदीश्वराचे दर्शन घेऊन, पालखी सोहळ्याचा समारोप
  • दु. १२.१० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस अभिवादन

हे सुद्धा वाचा :

संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजेंनी समन्वयकांना खडसावलं

संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

संभाजीराजेंनी सरकारच्या विरोधात आमरण उपोषण करण्याची घेतली भूमिका

छत्रपती संभाजीराजे भोसले रायगडावरील ‘मदार मोर्चा’वरुन संतापले; म्हणाले…

 

Pratiksha Pawar

View Comments

Recent Posts

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

3 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

3 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

4 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

4 hours ago

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

5 hours ago

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

5 hours ago