महाराष्ट्र

Shraddha Walker murder : श्रद्धाने आफताबविरोधात 2020साली केली होती पोलिस तक्रार!

देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा हत्याकांडात दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अशा परिस्थितीत पालघरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना श्रद्धाने आफताबविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती आता समोर येत आहे. 2020मध्ये आपल्यासोबत होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी श्रद्धाने ही तक्रार केली होती. आफताब आपला गळा दाबत असल्याची तक्रार श्रद्धाने केली होती. मात्र, काही दिवसांतच तिनी तक्रार मागे घेतली. आफताब पूनावाला आणि श्रद्धा हे पालघरचे रहिवासी होते.

2020 मध्ये श्रद्धाने नालासोपारा येथे तक्रार केली होती
श्रद्धा कॉल सेंटरमध्ये काम करत असताना श्रद्धा आणि आफताब दोघेही प्रेमात पडले. यानंतर त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. काही काळ पालघर जिल्ह्यात राहिल्यानंतर दोघेही दिल्लीत राहायला आले. मात्र, पालघर जिल्ह्यात राहत असतानाच दोघांचे संबंध बिघडल्याचे बोलले जात आहे. श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. आफताब आपला गळा आवळून मारहाण करत असल्याची तक्रार श्रद्धाने नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. 23 नोव्हेंबर 2020 रोजी श्रद्धाने ही तक्रार दाखल केली होती. 19 डिसेंबर 2020 रोजी त्यांनी ही तक्रार मागे घेतल्याचेही समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

Russia Ukraine war : युद्धाच्या धामधूमीत ब्रिटनचे पंतप्रधान युक्रेनच्या दौऱ्यावर

Shraddha Walker murder : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात खळबळजनक व्हिडीओ समोर

Ira Khan’s Engagement : आमिर खानची मुलगी इरा खानची नुपूर शिखरेसोबत झाली एंगेजमेंट

तपास अधिकाऱ्यांना माहिती देणार – तुळींज पोलिस
त्याचवेळी तुळींज पोलिसांनी याबाबत कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याने तक्रार मागे घेईपर्यंत पोलीस का थांबले. दरम्यान, तुळींज पोलिसांनी श्रद्धाच्या तक्रारीची माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यांनी तपास अधिकाऱ्यांना कळवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे याप्रकरणातील पुढील माहिती लवकरच समोर येईल असे सध्या सांगण्यात येत आहे.

त्याचवेळी श्रद्धा खून प्रकरण एक कोडे बनत चालले आहे. पोलिसांनी आरोपी आफताबच्या नार्को टेस्टची मागणी दिल्लीच्या साकेत कोर्टाकडे केली होती, ती मंजूर करण्यात आली आहे. आफताब नार्को टेस्टच्या माध्यमातून महत्त्वाची तथ्ये उघड करेल, ज्यामुळे हत्येचे गूढ उकलू शकेल, असे पोलिस अधिकाऱ्यांना वाटते. या कारणास्तव, पोलिस नार्को चाचणीद्वारे महत्त्वपूर्ण सुगावा शोधण्याचा प्रयत्न करतात.

प्रणव ढमाले

Recent Posts

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

10 mins ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

24 mins ago

मधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…

38 mins ago

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

2 hours ago

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे नाशिकचे दोन पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (Two policemen suspended) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (…

2 hours ago

सप्तशृंगी गडावर जाणारी टॅम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

शिर्डी येथून भाविकांना घेवून सप्तशृंगी गडाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला घाट रस्त्यावरील गणपती टेकडीजवळ काल…

3 hours ago