33 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
HomeजागतिकRussia Ukraine war : युद्धाच्या धामधूमीत ब्रिटनचे पंतप्रधान युक्रेनच्या दौऱ्यावर

Russia Ukraine war : युद्धाच्या धामधूमीत ब्रिटनचे पंतप्रधान युक्रेनच्या दौऱ्यावर

रशिया युक्रेन युद्ध गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असून रशिया युक्रेनवर सातत्याने क्षेपणास्त्रे डागत आहे. याच यु्द्धाच्या धामधूमीत ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान ऋषी सुनक हे युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत.

रशिया युक्रेन युद्ध गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असून रशिया युक्रेनवर सातत्याने क्षेपणास्त्रे डागत आहे. याच यु्द्धाच्या धामधूमीत ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान ऋषी सुनक हे युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत. सुनक यांनी युक्रेनची राजधानी कीवला पहिली भेट देत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी युक्रेनला भक्कम पाठिंबा सुरू ठेवण्याचे वचन दिले. ब्रिटनने युक्रेनला सुरूवातीपासूनच पाठिंब्याचे धोरण ठेवले आहे. दरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रेस ऑफिसने दोघांच्या भेटीचा फोटो प्रसिद्ध केला आहे.

या आठवड्यात दक्षिण-पूर्व पोलंडमधील एका गावात क्षेपणास्त्राने ठार झालेल्या लोकांपैकी एकाला शनिवारी दफन करण्यात आले. या आठवड्याच्या शेवटी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन जण ठार झाले होते, नंतर असे आढळून आले की, हा क्षेपणास्त्र हल्ला युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेतून डागलेल्या दोन क्षेपणास्त्रांमुळे झाला होता. या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर युक्रेनमधील युद्ध व्यापक होऊन त्यात नाटो देश सहभागी होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात होती.
पेंटागॉनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाने युक्रेनमधील क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये केलेली वाढ ही कीवच्या हवाई संरक्षणाचा पुरवठा कमी करण्याच्या उद्देशाने तसेच रशियाचे अवकाशात आपले वर्चस्व ठेवण्यासाठी केलेला आहे. रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे युक्रेनची जवळपास निम्मी ऊर्जा प्रणाली विस्कळीत झाली आहे. हिवाळा जवळ आल्याने शहराला पॉवर ग्रीड पूर्णपणे बंद होण्याची शक्यता युक्रेन सरकार आणि राजधानी कीवमधील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी असा इशारा दिला आहे.
हे सुद्धा वाचा:

Anil Parab Bail : अनिल परब यांना मोठा दिलासा; रिसॉर्ट प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

controversial statement : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना, मनसे आक्रमक

Koshyari’s Controversial Statement : “अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही !”

श्रषी सुनक यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेऊन त्यांना आपण कायम तुमच्या पाठिशी असल्याचे आश्वस्त केल्याचे वृत्त आहे. युक्रेन-रशिया युद्ध अद्यापही विराम घेण्याची चिन्हे नसल्यामुळे युक्रेनची स्थिती नाजूक होऊ शकते, अशातच युरोपीय राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा देण्याचे आपले धोरण कायम ठेवले आहे. युक्रेन युद्धामुळे रशियाचे देखील मोठे नुकसान होत असल्याच्या बातम्या समोर येत असल्या तरी रशियाने देखील अद्याप या युद्धाला विराम देण्याचे कोणताही निर्णय घेतलेला नाही.

याचवेळी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी युक्रेनला भेट देत आपला पाठिंबा पूर्वीप्रमाणे राहील असे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षानां सांगितले आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून हे युद्ध सुरू असून जागतिक व्यापारावर देखील त्याचे परिनाम झाले आहेत. रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक व्यापारावर परिनाम होऊन महागाई वाढली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी