महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंच्या मदतीमुळे गरोदर कोरोनाग्रस्त महिलेला मिळाले उपचार

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या दुसरी लाटेने रौद्ररूप धारण केले आहे. बारामती ग्रामीण मध्ये राहणारी 31 वर्षीय विद्या दरडे आठ महिन्याची गरोदर कोरोनाग्रस्त महिलेची ऑक्सिजन लेवल 80 पर्यंत आल्यावर तातडीने पुण्याला हालवण्यासाठी सुप्रिया सुळेंनी मदत केली(Supriya Sule helped the pregnant woman to move to Pune immediately after her oxygen level reached 80).

अचानक २१ एप्रिलला विद्याच्या कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला, विद्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, आता हे नक्की कोरोनाच आहे अशी शंका येऊन कुटूंब अक्षरशः हवालदिल झाले. विद्याची मैत्रीण डेन्टीस्ट डॉ. मृणाल यांना संपर्क केल्यावर त्यांनी कोविड टेस्ट करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार लगेच अँटीजन रैपिड टेस्ट केली, मात्र ती निगेटीव आली, सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला पण श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पुन्हा RT-PCR करण्याचा सल्ला दिला, पण त्या टेस्टचा रिपोर्ट चार चार दिवस येत नसल्याने काय करावे सुचेना, इन्दापुरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रा हलवले. प्रथम उपचार तिथे करुनही स्थिती आवाक्यात नसल्याने बारामतीच्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे पाठवण्यात आले. तिथे तपासणी झाल्यावर ऑक्सिजनची मदत लागत असल्याचे स्पष्ट झाले आणि कुटुंब सैरभैर झाले. नेमके काय समजावे कळेना, अखेर स्त्री रोग तज्ञ्यांनी विद्याला आणि बाळाला वाचवायचे असेल तर पुण्याला जाण्याचा सल्ला दिला.

बीकेसी जम्बो कोविड सेंटर सुसज्ज नसल्याचा मनसेचा दावा

धक्कादायक! न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन

पुण्यात रुग्णालयातली भयंकर स्थिती ऐकूण-वाचून माहीती होती. त्यामुळे बेड आणि तो ही ऑक्सिजन बेड मिळेल का हा मोठा प्रश्न होता. पुन्हा डॉ. मृणालला फोन केला, त्यांनी पुण्यातले सेल्स टैक्सचे उपायुक्त गिरीश कट्टी यांना मदत मागितली, दीड दिवस अशीच स्थिती सुरु होती, अगदी रुग्णवाहिका ही मिळत नव्हती, ती मिळाली तर आहे त्या दवाखान्यातून घेऊन जायचे तर तिकडे बेड तरी मिळाले पाहिजे, बेड मिळाले तर बारामती ते पुणे बेड रिझर्व राहिले पाहिजे होते कारण एवढ्या लोकांना गरज आहे, यापासून ते अनेक अडचण येत होत्या.

विद्याची स्थिती तर गंभीर होत होती. अधिकारी गिरीश कट्टी आणि डॉ. मृणाल यांची याबाबतच चर्चा सुरु असताना दुसऱ्या एका रुग्णाच्या मदतीसाठी पत्रकार रफ़ीक मुल्ला यांचा कट्टींना फोन आला आणि त्यांनी विद्याची हकीकत मुल्ला यांना सांगितली. वेळीच मदत मिळाली नाही तर माता आणि बाळ वाचणारच नाही हे ओळखून रफ़ीक मुल्ला यांनी इतरत्र  फोन करुन वेळ घालवण्यापेक्षा थेट सुप्रिया ताई सुळे यांना फोन केला. माहिती घेऊन तातडीने ताईंनी पालिका आयुक्तांना बेड उपलब्ध करण्याच्या सुचना दिल्या. अक्षरशः दोन मिनिटात भारतीसह दोन रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आला, ताईंचे पीए मयुर जगताप यांनी पुढच्या काही मिनिटात लगेच तिथे प्रत्यक्ष जाऊ निश्चिती केली.

Modi’s ‘liberalised and accelerated’ vaccination drive is neither liberalised nor accelerated

बारामतीहून रात्री उशिरा विद्याला घेऊन रुग्णवाहिका भारती रुग्णालयात पोहोचली, त्याठिकाणी ही कोविड टेस्ट केली परंतु पुन्हा ती निगेटीव आली. पण घसरत असलेली ऑक्सिजन पातळी आणि श्वास घेण्यास होत असलेला त्रास सगळी गुंतागुंत असल्याने स्त्रीरोग तज्ज्ञासह विविध तज्ज्ञ डॉक्टर समुह लागणार होता, भारती रुग्णालयाचे प्रमुख आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनाही रफ़ीक मुल्ला यांनी माहिती दिली, त्यांनी स्वत: विद्याच्या स्थितीची माहिती घेतली आणि प्रकृती स्थिर होईल असे उपचार करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ससून मध्ये अशा गरोदर महिलांवर यशस्वी उपचार करणारी टिम असल्यामुळे सुप्रियाताई आणि विश्वजीत कदम यांच्या सुचनेने विद्याला ससून रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे बेड आणि त्या डॉक्टर समुहाचे उपचार मिळण्याची पुन्हा खात्री केली ती सुप्रिया ताई ससूनमध्ये स्पष्ट झाले की विद्याला निमोनीया झाला आहे आणि तो कोविड निमोनीयाच आहे.

त्यानंतर चांगले उपचार करुन आता विद्या संकटातून बाहर पडली आहे, ऑक्सिजन लेवल 80 वरुन 95 पर्यंत सुधारली आहे. आता ऑक्सिजनची गरज लागत नाही. पुढच्या काही दिवसात विद्याची प्रसूतीही व्यवस्थित होईल याची डॉक्टर्सनी खात्री केली आहे, तसे उपचार आणि लक्ष दिले जात आहे. बाहेर असलेल्या भयंकर स्थितीमध्ये विद्याला वेळीच उपचार मिळू शकले. यासाठी अनेकांची मदत झाली. विद्याने आणि तिच्या कुटुंबीयांनी त्या सर्व मदतकर्त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

 

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

11 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

11 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

12 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

13 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

14 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

15 hours ago