32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन

धक्कादायक! न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन

टीम लय भारी

मुंबई :- आजतकचे लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे (Popular news anchor Rohit Sardana has died of a heart attack). रोहित सरदाना यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर दिल्लीत रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले.

इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी तसेच झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी ट्विट करुन ही धक्कादायक माहिती दिली. (Rohit Sardana Aaj Tak news anchor passes away tweet by Sudhir Chaudhary).

“राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल” रोहित पवारांचा अतुल भातखळकरांना टोला

गोंदवलेकर महाराज संस्थानचे ‘गिरे तो भी टांग उपर’

TV journalist Rohit Sardana dies of heart attack

रोहित सरदाना हे झी न्यूजमधून आज तकमध्ये आले होते. मितभाषी आणि संयमी न्यूज अँकर म्हणून रोहित सरदाना परिचीत होते (Popular news anchor Rohit Sardana has died of a heart attack). त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने दिल्लीतील मेट्रो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

सुधीर चौधरी हे ट्विटमध्ये म्हणतात, “आताच थोड्या वेळापूर्वी जितेंद्र शर्मांचा फोन आला. त्यांनी जे सांगितले ते ऐकून हात थरथर कापू लागले. माझा मित्र आणि सहकारी रोहित सरदानाच्या मृत्यूची ती बातमी होती (That was the news of the death of my friend and colleague Rohit Sardana). हा व्हायरस आमच्या इतक्या जवळच्या कोणाला घेऊन जाईल याची अजिबात कल्पना नव्हती. हा देवाचा अन्याय आहे, ओम शांती”

रोहित सरदाना हे अनेक वर्षांपासून टीव्ही मीडियात कार्यरत होते (Rohit Sardana had been working in TV media for many years). ‘आज तक’ वाहिनीवरील दंगल या शोचं ते अँकरिंग करत होते. 2018 मध्ये त्यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

मित्रांनो खूपच धक्कादायक बातमी आहे. लोकप्रिय टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन झाले (Popular TV news anchor Rohit Sardana has passed away). आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला.  त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन. आरआयपी, असे ट्विट राजदीप सरदेसाई यांनी केले आहे.

 

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी