महाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी केले ‘रास्ता रोको’

पावसाने दडी मारल्यामुळे यंदा खटाव-माण तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. पिके तर हातची गेलीच आहेत, मात्र चारा उपलब्ध नसल्याने जनावरे कशी सांभाळावी ही चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. सत्ताधारी गतिमान सरकार जरी म्हणत असले तरी शेतकऱ्यांबाबतचे जे निर्णय तातडीने घ्यायला हवे ते मात्र अत्यंत ढिम्म गतीने सुरु असल्याचे चित्र आहे.

खटाव-माण तालुक्यात चारा डेपो, पाण्याचे टँकरचां अपुरा पुरवठा, पुरेसे पाणी घेऊन टँकर न जाणे, विजेचे अघोषित भारनियमन, कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घ्या आणि माण खटाव तालुके दुष्काळी जाहीर करा, पीकविमा तातडीने अदा करा. या आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने फलटण आणि दहिवडी राज्य मार्गावर बिजवडीमध्ये रास्ता रोको आंदोलन केले.  या आंदोलनामुळे वाहनाच्या दोन तीन किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या प्रश्नावर तातडीने मार्ग निघाला नाहीतर येत्या पंधरा दिवसांत प्रांत कार्यालयावर गुरेढोरे घेऊन बिऱ्हाड मोर्चा काढण्याचां निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर केला.

हे सुद्धा वाचा 
मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाची उरलीसुरली लाज गेली!
अजित पवार गट घड्याळाच्याच आशेवर
मोदींच्या निकटवर्तीय मंत्र्याच्या घरात आढळला मृतदेह! मंत्री महोदय फसणार?

यावेळी राज्य प्रवक्ते अनिल पवार, राज्य प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, खटाव तालुकाध्यक्ष दत्तुकाका घार्गे, खटाव माण संपर्कप्रमुख शरद शेठ खाडे, तालुका संघटक संतोष तुपे, यांच्याशिवाय जिल्हाप्रसिध्दी प्रमुख केशव जाधव, मान तालुकाध्यक्ष राजू मुळीक, वैभव पाटील, संतोष बागल, अजय पाटील, सत्यवान मोहिते, रवींद्र पाटील, पांडुरंग फडतरे, संतोष रासकर विजय माने, राजाराम देशमुख, विठ्ठल देशमुख, शंकर देशमुख , दादासाहेब शिनगारे, केशव जाधव, दादासो भोसले, संतोष भोसले यांचेसहबिजवडी शाखेचे सगळी टीम यांच्यासह कातरखटाव, पेडगाव, बोंबाले विखळे आदी गाव स्वाभिमानी टीम चे पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाला रासपचे विरकर, राष्ट्र वादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष प्रशांत विरकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भोसले यांच्यासह अनेक शेतकरी, दूध उत्पादक उपस्थित होते.

प्रदीप माळी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

7 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

7 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

7 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago