31 C
Mumbai
Friday, September 15, 2023
घरक्राईममोदींच्या निकटवर्तीय मंत्र्याच्या घरात आढळला मृतदेह! मंत्री महोदय फसणार?

मोदींच्या निकटवर्तीय मंत्र्याच्या घरात आढळला मृतदेह! मंत्री महोदय फसणार?

केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या लखनौ येथील निवासस्थानी शुक्रवारी पहाटे गोळ्या झाडलेल्या अवस्थेत एका ३० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. मृतदेहजवळ मंत्री कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर ह्याचा परवाना असलेले पिस्तूल आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे. खुद्द केंद्रीय मंत्र्याच्याच घरात हत्येसारखी घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मृतांचे नाव विनय श्रीवास्तव असून तो विकास किशोर ह्याचा मित्र असल्याचे समजते.

याप्रकरणी, पश्चिम लखनौचे पोलिस उपायुक्त राहुल राज यांनी सांगितले की, “विनय श्रीवास्तव असे मृताचे नाव असून केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा विकास किशोर याच्याकडे परवाना असलेले पिस्तूल मृतदेहाजवळून जप्त करण्यात आले आहे.”

डीसीपी राहुल राज म्हणाले, “विनय श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विकास किशोरचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीम आली आहे आणि आम्ही सीसीटीव्ही व्हिज्युअल देखील तपासत आहोत. याप्रकरणी, एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ”

ही घटना आज (शुक्रवार, 1 सप्टेंबर) पहाटे 4 च्या सुमारास घडली. विनय श्रीवास्तव यांची हत्या झाल्याचा आरोप करणाऱ्या मृताच्या भावाच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आत्महत्येची शक्यता नाकारून, मृताच्या भावाने सांगितले की, विनयचा शर्ट फाटलेला असून, घटनास्थळी उपस्थित लोकांमध्ये हाणामारी झाल्याचे सूचित होते.

“माझा भाऊ विनय श्रीवास्तव याची केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली आहे. माझा भाऊ त्याचा मुलगा विकास किशोरचा मित्र होता. घटना घडली तेव्हा तीन लोक तिथे उपस्थित होते पण विकास कुठे होता याची मला कल्पना नाही. त्याचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले आहे,” विनय श्रीवास्तवचा भाऊ म्हणाला.

या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री असलेले भाजप खासदार म्हणाले की, “विनय हा त्यांच्या मुलाचा चांगला मित्र होता, या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे आणि संबंधित व्यक्तींना सोडले जाणार नाही.”

केंद्रीय मंत्र्याच्या म्हणण्यानुसार, घटना घडली तेव्हा त्यांचा मुलगा घरात उपस्थित नव्हता. भाजप खासदार कौशल किशोर यांनी सांगितले की, “विकासला जेव्हा हे कळले तेव्हा त्याला खूप वाईट वाटले, मृत विनय हा माझ्या मुलाचा खूप चांगला मित्र होता.”

हे ही वाचा 

प्रेम संबंधास नकार, एक्स गर्लफ्रेंडची हत्याकरुन मृतदेह आंबोली घाटात फेकला

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणानेच दिली होती मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; वाचा काय होती त्याची मागणी

बायकोच्या मानलेल्या भावावर आला ‘तसला’ संशय; अल्पवयीन मुलाची हत्या करुन घरातच लपविला मृतदेह

किशोरने सांगितले की, घटना घडली तेव्हा पोलिसांनी त्याच्या मित्रांना आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांना ताब्यात घेतले होते. मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. “पोलिसांनी जप्त केलेले पिस्तूल माझ्या मुलाचे, विकास किशोरचे आहे. पोलीस याबाबत कसून तपास करत आहेत. याबाबत कोणत्याही दोषींना सोडले जाणार नाही”, असे मंत्री म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी