महाराष्ट्र

तळीये गावातील अजूनही 32 नागरिक बेपत्ता; मृतांचा आकडा 53 वर, बचाव कार्य सुरूचं

टीम लय भारी

महाड:- गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. तळीये गावात आज पाचव्या दिवशीही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे. आतापर्यंत बचाव पथकाला 53 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर 32 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत (Taliye village The situation has worsened due to rains)

पाच दिवसापूर्वी तळीये येथे डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 35 घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडीखाली दबलेले 32 मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आले होते. त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन कालपर्यंत 53 मृतदेह बाहेर काढले.अजूनही 32 नागरिक बेपत्ता आहेत. मात्र, पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेला चिखल यामुळे बचाव पथकाला रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा निर्माण होत आहे.

आंबेघरमधील मृतांचा आकडा 15 पर्यंत वाढेल, मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

एकाच घरातील सहाजणांचा मृत्यू, नातलगांचा हंबरडा ऐकून उपस्थितांचीही मने हेलावली

डोंगराच्या दरडीबरोबर दोन ते चार किलोमीटरपर्यंत हे नागरिक घरंगळत गेले असावेत असे सांगितले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण दोन-चार किलोमीटरच्या परिसरातही शोधाशोध करण्यात येत आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने आज सकाळपासूनच शोध मोहीम हाती घेतली आहे. मात्र, पाऊस जास्त असल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा येत आहे. तसेच चिखल झाल्याने त्यातून मार्ग काढत जाणेही कठिण होत आहे (becoming difficult to get out of the mud everywhere)

तळीये गावात
एनडीआरएफच्या टीमकडून बचाव कार्य सुरु आहे

महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. तळीये गावात एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे (Taliye village Rescue operations are underway at the site with the help of NDRF and local citizens)

पुराच्या तडाख्यातून तब्बल 90 हजार लोकांना वाचविले, सरकारचा दावा

Taliye village not a landslide-prone spot but heavy rains caused the incident: Maha dy CM

एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आले नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.

राज्याची परिस्थिती काय?

राज्यात पूरग्रस्त भागातून सुमारे 2 लाख 30 हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. राज्यात एकूण 149 मृत्यू झाले आहेत. 3248 जनावरांचे मृत्यू झाले आहेत. एकंदर 50 लोक जखमी आहेत. 100 लोक अजूनही बेपत्ता आहेत, 875 गावे बाधित झाली आहेत.

 

Sagar Gaikwad

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

46 mins ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

1 hour ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

1 hour ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

2 hours ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

2 hours ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

14 hours ago