31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रपुराच्या तडाख्यातून तब्बल 90 हजार लोकांना वाचविले, सरकारचा दावा

पुराच्या तडाख्यातून तब्बल 90 हजार लोकांना वाचविले, सरकारचा दावा

 

टीम लय भारी
महाड : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक बचाव यंत्रणा दोन दिवसांपासून जीवतोड मेहनत घेत आहेत. यानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व पूरग्रस्तांना धीर देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी महाड कडे रवाना झाले. (CM uddhav thackeray off to mahad this morning)

दुपारी बारा वाजता ते मुंबहुन निघून हेलिकॉप्टर मधून ते महाड कडे रवाना झाले आहेत. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे त्यांचे हेलिकॉप्टर उतरले. त्यानंतर ते महाडहुन वाहनाने तळीये येथे पोहोचले. (CM left for taliye via mumbai)

टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकून मीराबाई चानू यांनी रचला इतिहास

मुख्यमंत्र्यांची घोषणा; अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या नातलगांना 5 लाखाची मदत

दुपारी दीड च्या सुमारास त्यांनी पूर परिस्थिती ची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी तळीये येथून निघून महाड मार्गे पुन्हा हेलिकॉप्टरमधून मुंबईत परततील.

CM
मुख्यमंत्र्यांची पुरग्रस्तांना हेलिकॉप्टर मधून भेट.

पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवाल

मदत व पुनर्वसन विभागाने आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे 90 हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे.
एकूण 76 मृत्यू झाले असून 75 जनावरांचे मृत्यू आहेत.
एकंदर 38 लोक जखमी असून तीस लोक बेपत्ता आहेत. तसेच मालमत्तेची अपरिमीत हानी झालेली आहे. ( 90 thousands safely relocated, 76 dead, 38 injured)

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाड येथील तळीये गावास भेट दिली, यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत, ‘तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ’ अशी ग्वाही दिली.

पुराच्या तडाख्यातून तब्बल 90 हजार लोकांना वाचविले, सरकारचा दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली.

पुराच्या तडाख्यातून तब्बल 90 हजार लोकांना वाचविले, सरकारचा दावा पुराच्या तडाख्यातून तब्बल 90 हजार लोकांना वाचविले, सरकारचा दावा

डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे आणि आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्री साहेबांनी यावेळी दिले.

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आता लष्करालाही केले पाचारण

Heavy rains cause floods in parts of Maharashtra

कालपर्यंत भारतीय नौदल, भारतीय वायुदल त्याच बरोबर भारतीय लष्कराने सुद्धा अनेक बचाव पथकांतून पुरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. डिफेन्स पथकांसोबतच अनेक स्थानिक पथकांनी, नगरपालिका पथकांनी तसेच काही स्वयंसेवकांनी मदतीला हात पुढे केला होता. (Indian army, Indian air forces, indian Navy along with other rescue teams to help people)

पुरग्रस्तांची व्यवस्था उत्तम लावून देण्यासाठी त्यांना सरकार कडून मदत मिळेल. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना सुद्धा मदत मिळेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी