महाराष्ट्र

नाशिक लोकसभेसाठी भाजपतर्फे या नावाची होतेय चर्चा …..

नाशिकची (nashik loksabha ) जागा लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाला ( bjp ) सोडावी यासाठी नाशिकच्या सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. भाजपला नाशिकची जागा सोडावी असा आर्त टाहो सगळ्यांनी नेतृत्वाकडे फोडला. नाशिकची जागा भाजपला सुटली तर भारतीय जनता पक्षाचे सह-मुख्य प्रवक्ते, भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस व श्रीकांत भारतीय यांचे खास गोटातील व निकटवर्तीय अजित चव्हाण हे देखील यात बाजी मारून डार्क हॉर्स ठरू शकतात ? भारतीय जनता पक्षाच्या मिशन २०२४ निवडणूक समन्वय समितीच्या राज्य सहसमन्वयक पदाची महत्वपूर्ण जबाबदारी अजित चव्हाण यांच्याकडे आहे.(The name is being discussed by the BJP for the Nashik Lok Sabha )

गुजरात मधून केंद्रीय नेतृत्वाच्या निकटवर्ती असलेल्या मंडळींनी त्यांच्यासाठी प्रयत्न चालवण्याची सूत्रांकडून माहिती आहे. त्याचबरोबर नाशिक येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही वरिष्ठांनी देखील भाजप नेतृत्वाकडे अजित चव्हाण यांच नाव लावून धरल्याची माहिती आहे. घराघरात ओळखीचा चेहरा, उत्कृष्ट वक्ता, अजातशत्रू प्रतिमा, भाजपा मध्ये अल्पावधीत राज्य व स्थानिक पातळीवर सर्वांशीच असलेले मधुर संबंध व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ.श्रीकांत भारतीय, गिरीश महाजन या वरिष्ठ नेतृत्वाशी असलेली जवळीक त्यामुळे अजित चव्हाण यांच्या वरती अल्पावधीत पक्षात महत्त्वाच्या जबाबदारी देण्यात आल्या. गेले दोन दिवस अजित चव्हाण दिल्ली, गुजरात या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वाच्या जवळच्या नेत्यांशी गाठीभेटी घेऊन रात्री उशिरा नागपूर येथे रवाना झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सोलापूर येथे राम सातपुते यांच्याप्रमाणेच पक्ष नेतृत्वाच्या उमेदवार देण्याचं धक्का तंत्रही असू शकत लोकसभा उमेदवारीसाठी अजित चव्हाण परफेक्ट मटेरियल असल्याने नाशिकची जागा भाजपला सुटली तर अजित चव्हाण हे या शर्यतीत ‘डार्क हॉर्स’ ठरू शकतात. असे बोलले जात आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला सुटला पाहिजे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची शासकीय निवासस्थान सागर बंगला येथे नाशिक भारतीय जनता पार्टीचे आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले ,आमदार सीमा हिरे, आमदार राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, केदा आहेर, गणेश गीते, मंडल अध्यक्ष भगवान काकड, अविनाश पाटील ,रवींद्र पाटील, एडवोकेट अरुण खांडबहाले, कुणाल वाघ, अमोल दिनकर पाटील, महेश हिरे, अजय दराडे, सुरेश पाटील,सोनाली कुलकर्णी आदी उपस्थित होते..

टीम लय भारी

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

16 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

16 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

16 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

16 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

16 hours ago

भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये…

17 hours ago