महाराष्ट्र

Two NCP groups fight: सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत बारामतीत दोन गट एकमेकांना भिडले

सध्या भाजप नेत्या आणि देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitharaman) बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) असणारा गड उधवस्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा (BJP) हा मास्टर प्लॅन असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून बारामती जिल्हा सर्वत्र चर्चेत आहे. अशातचं आता पुन्हा एकदा बारामतीतील एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी या सगळ्याला कारण ठरली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची सभा. या कार्यक्रमात दोन गटांत तुफान राडा (Group Fight) झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी हा गोंधळ रस्ता रुंदीकरणाच्या प्रश्नावरून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (26 सप्टेंबर) बारामती तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. त्यावेळी त्यांनी जेजूरी ते नीरा नरसिंहपूर या गावांना जोडणारा रस्ता ज्या गावातून जातो त्या डोर्लेवाडी गावाला भेट दिली. या गावातील नागरिकांशी संवाद साधत असतानाच गावकऱ्यांच्या दोन गटांनी सुप्रिया सुळेंसमोरच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गावठाणात रस्ता रुंदीकरण हे 10 मीटर व्हावे की 7 मीटर यावरून हा वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. खुद्द सुप्रिया सुळेंना मध्यस्ती करत हा वाद मिटवावा लागला. यावेळी वादाचे निरसन करण्यासाठी सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांना सोबत घेऊन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन द्यावे लागले. सुळेंनी दिलेल्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी संमती दर्शवत वाद मिटवला.

हे सुद्धा वाचा –

Narayan Rane Bungalow Demolition: नारायण राणेंच्या बंगल्यावर पुन्हा ‘बुलडोजर!’ सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

Indian Cricket Team Created New Record: भारताने मारले एका दगडात दोन पक्षी! ऑस्ट्रेलियाला हरवत मोडलाय पाकिस्तानचा विक्रम

Indian Cricket Team Created New Record: भारताने मारले एका दगडात दोन पक्षी! ऑस्ट्रेलियाला हरवत मोडलाय पाकिस्तानचा विक्रम

बारामती तालुक्यात ठिकठिकाणी राज्यमार्गाचे काम सुरू झाले आहे. यातीलच एक रस्ता डोर्लेवाडी गावातून जातो. या ठिकाणी 10 मीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर आहे. मात्र, गावकऱ्यांमध्ये रुंदीकरणावरून वाद सुरू आहेत. एका गटाने हा रस्ता केवळ 7 मीटर रुंद करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तर दुसरा गट 10 मीटर रुंदीकरणाच्या बाजूने आहे. अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे बेटीला आल्यावर गावकऱ्यांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडायला सुरुवात केली. यावेळीच मोठ्या प्रमाणावर बाचाबाची सुरू झाली आणि वादाला तोंड फुटले.

दरम्यान, सध्या भाजपने बारामती मतदारसंघात आपली ताकद लावण्यासाठी रणशिंग फंकले आहे. अशा परिस्थितीत खुद्द शरद पवारांची लेक आणि परिसरीतील खासदार असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत निर्माण झालेला वाद संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. शिवाय यावरून सुप्रिया सुळे यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजप आगामी काळात प्रयत्न करेल असा अंदाजदेखील वर्तवण्यात येत आहे.

टीम लय भारी

Recent Posts

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

42 mins ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

1 hour ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

2 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

2 hours ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

2 hours ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

18 hours ago