29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाIndian Cricket Team Created New Record: भारताने मारले एका दगडात दोन पक्षी!...

Indian Cricket Team Created New Record: भारताने मारले एका दगडात दोन पक्षी! ऑस्ट्रेलियाला हरवत मोडलाय पाकिस्तानचा विक्रम

एका वर्षात सर्वाधिक एकूण 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्तानने गेल्या वर्षी हा विक्रम केला होता. पण टीम इंडियाने यावर्षी एकूण 21 टी-20 सामने जिंकले आहेत. हा विक्रम आणखी पुढे नेण्याची भारताकडे आता मोठी संधी आहे

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत टी-20 मालिका संपुष्टात आली आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात लाजीरवाणा पराभव पदरी पडल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) मालिकेत जोरदार मुसंडी मारली. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत भारताने मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकण्याचे गेल्या 9 वर्षांपासूनचे स्वप्न साकार केले. तिसरा टी-20 सामना जिंकण्यासोबतच टीम इंडियाने टी-20 क्रिकेटच्या प्रकारात‍ नवा इतिहास रचला आहे. टीम इंडियाने आता पाकिस्तानला मागे टाकून एका वर्षात सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारा संघ बनला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर भारताने पाकिस्तानला देखील धक्का दिला आहे. त्यामुळे भारताने एका दगडात दोन पक्षी मारसले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

एका वर्षात सर्वाधिक एकूण 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्तानने गेल्या वर्षी हा विक्रम केला होता. पण टीम इंडियाने यावर्षी  एकूण 21 टी-20 सामने जिंकले आहेत. हा विक्रम आणखी पुढे नेण्याची भारताकडे आता मोठी संधी आहे. टी-20 प्रकारामध्ये टीम इंडियाचा यंदाचा रेकॉर्ड खूप चांगला राहिला आहे. 2022 मध्ये भारताने आतापर्यंत 29 टी-20 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 21 जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेशिवाय भारताला टी-20 विश्वचषकातही सहभागी व्हायचे आहे. यानंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकाही खेळायची आहे. त्यामुळे भारताने निर्माण केलेला नवीन विक्रम आणखी वरच्या स्तरावर नेऊन तो कायमसाठी अबाधित बनवण्याची सुवर्णसंधी टीम इंडिया आणि कर्णधार रोहित शर्माकडे उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा –

Shivpratap Garudjhep Trailer: अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Sonia Gandhi : सोन‍िया गांधींची डोकेदुखी वाढली

School Bus Accident : … आणि बघता बघता स्कूल बस उलटली, पालकांची पळापळ

रोहित शर्माचा (Rohit Sharma) कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये विक्रमही चांगला होत आहे. रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून टीम इंडियाने एकही द्विपक्षीय टी20 मालिका गमावलेली नाही. एवढेच नाही तर, रोहित शर्माने यशस्वी कर्णधार म्हणून विराट कोहलीलाही (Virat Kohli) मागे टाकले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने एकूण 32 टी-20 सामने जिंकले होते. रोहित शर्माने आतापर्यंत 33 टी-20 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. मात्र, रोहित शर्मा हा भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. भारतासाठी टी20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम महेंद्र सिंग धोनीच्या (MS Dhoni) नावावर आहे. धोनीने भारताला 42 सामन्यांत विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे आता टी-20  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून धोनीला पिछाडत एक नवा विक्रम निर्माण करण्याची संधी देखील रोहितकडे उपलब्ध आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी