32 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
HomeमुंबईNarayan Rane Bungalow Demolition: नारायण राणेंच्या बंगल्यावर पुन्हा 'बुलडोजर!' सुप्रीम कोर्टाने दिले...

Narayan Rane Bungalow Demolition: नारायण राणेंच्या बंगल्यावर पुन्हा ‘बुलडोजर!’ सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

भाजप पक्षाचे केंद्रीय मंत्री असणाऱ्या नारायण राणेंना (Narayan Rane) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दणका दिला आहे. नारायण राणेंच्या नावे असलेल्या अधीश बंगल्यातील अनाधिकृत बांधकाम पाडण्यासाठी हायकोर्टाने (High Court) दिलेला आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. याशिवाय येत्या दोन आठवड्यात नारायण राणेंनी स्वत:हून हे बांधकाम पाडावे अन्यथा मुंबई महापालिका (BMC) कारवाई करेल असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलेले आहे. अशातचं आता महाराष्ट्र भाजपाला (BJP) धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भाजप पक्षाचे केंद्रीय मंत्री असणाऱ्या नारायण राणेंना (Narayan Rane) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दणका दिला आहे. नारायण राणेंच्या नावे असलेल्या अधीश बंगल्यातील अनाधिकृत बांधकाम पाडण्यासाठी हायकोर्टाने (High Court) दिलेला आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. याशिवाय येत्या दोन आठवड्यात नारायण राणेंनी स्वत:हून हे बांधकाम पाडावे अन्यथा मुंबई महापालिका (BMC) कारवाई करेल असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे सध्या नारायण राणेंसह संपूर्ण भाजपला दणका बसला असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. मुंबईतील जुहू येथे स्थित असलेल्या नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यावरील अनाधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. सीआरझेड आणि एफएसआय कायद्याचे उल्लंघन याप्रकरणात झाले असल्याचे हायकोर्टाला आढळले होते. यावेळी दोन आठवड्यात कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले होते. या आदेशाविरोधात नारायण राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आणि हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, आता राणेंची ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राणेंच्या बंगल्यावर कारवाई होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे.

नारायण राणे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेकदा चर्चेत राहिले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या विधानावरून त्यांना अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे राणे जेवण करत असताना वाढलेल्या ताटावरून त्यांना केलेली अटक घटनाबाह्य असल्याचा दावा राणे समर्थकांकडून करण्यात आला होता. त्यावेळी राणेंच्या अटकेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच रान पेटले होते. शिवाय महाविकास आघाडीवर कडाडून टीका करण्यात आली होती. शिवाय, त्यानंतर मुंबई महापालिकेने राणेंच्या बंगल्यावर केलेली कारवाई सुडभावनेने केली असल्याची टीका नारायण राणे यांनी केली होती. मात्र, आता या प्रकरणात राणेंच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा –

Indian Cricket Team Created New Record: भारताने मारले एका दगडात दोन पक्षी! ऑस्ट्रेलियाला हरवत मोडलाय पाकिस्तानचा विक्रम

Sonia Gandhi : सोन‍िया गांधींची डोकेदुखी वाढली

School Bus Accident : … आणि बघता बघता स्कूल बस उलटली, पालकांची पळापळ

दरम्यान, गेल्या आठवड्याभरातच सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला कोर्टाने दोन वेळा दणका दिला आहे. पहिल्यांदा शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या विरोधात कोर्टाचा निकाल आला होता. यावरून यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी घ्यावा असा आदेश कोर्टाने दिला होता. त्यानंतर आता राणेंच्या विरोधात आलेला निकाल देखील महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या भाजप पक्षासाठी धोकादायक असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी