महाराष्ट्र

Uddhav Thackeray: निणडणूक चिन्ह गोठवण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाने घेतली दिल्ली उच्च न्यायालयात धाव

शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश रद्द करण्यात यावा यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्यातील व एकनाथ शिंदे यांच्यातील ‘खरी’ सेना कोणती या मुद्यावरून नव्याने वाद सुरू झाला आहे. शनिवारी,निवडणूक आयोगाने 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्षाचे नाव आणि त्याचे निवडणूक चिन्ह वापरण्यास मनाई केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे प्रत्येकी तीन चिन्हे आणि नावांची निवड अधिकृतपणे सादर केली आहे.

उद्धव ठाकरे गटाने आज याचिकेवर निर्णय देण्याची केली मागणी –

उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला आहे. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह व धनुष्यबाण त्यांनी पाठवलेल्या कागदपत्रांची तपासणी न करता गोठवली आहे. त्यासोबतच या प्रकरणाची आज सुनावणी होऊन आजच निकाल द्यावा अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली उच्च न्यायालयापुढे केली आहे.

आमचा न्यायावर विश्वास आहे – दीपक केसरकर

उद्धव ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरेंच्या गटामुळे विलंब झाला आणि त्यामुळेच शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि नाव गोठले आहे. यासाठी त्यांनी आम्हाला दोष देऊ नये. त्यांना न्यायालयात जायचे आहे तर जाऊ द्या. आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे.

हे सुद्धा वाचा –

Mid-Day Meal Programme: अर्थ मंत्रालयाच्या मंजूरीनंतर शिक्षण मंत्रालयाने मिड-डे मील योजनेमध्ये जेवण बनविण्याच्या खर्चात केली वाढ

Ind vs SA 2nd ODI : श्रेयस अय्यर व इशान किशनच्या झंझावातापुढे दक्षिण आफ्रिकेचा संघ झुकला; मालिकेत साधली 1-1 अशी बरोबरी

Tej Pratap Yadav: तेज प्रताप यादव व श्याम रजक यांचा राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये धिंगाणा

दोन्ही गटांनी पर्यायी चिन्हे आणि नावे सादर केल्याची पुष्टी मतदान पॅनेलमधील सूत्रांनी दिली. त्यांनी मागितलेली चिन्हे सारखी नाहीत आणि इतर कोणत्याही पक्षाकडून वापरली जात नाहीत याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोग आता त्यांची तपासणी करेल.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाने रविवारी निवडणूक आयोगाला त्रिशूळ, जळती मशाल आणि उगवता सूर्य या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह व सूचविलेल्या नावांपैकी एक नाव पोटनिवडणुक होण्याच्या पूर्वी निश्चित करण्याची विनंती केली होती.

उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट अंधेरीची पोटनिवडणूक लढवत आहे. शिंदे गटाचा मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 14 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने दोन्ही गटांच्या पर्यायी चिन्हे आणि नावांबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

अश्विन शेश्वरे

He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

2 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

3 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

3 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

3 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

6 hours ago