महाराष्ट्र

पवारांनी २४ तासांत भूमिका बदलली, असे कोणते गुपित अनिल देशमुखांकडे?

टीम लय भारी

मुंबई :-  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर आता थेट  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच टांगती तलवार आहे. अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन हटवण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्यानंतर मोठमोठे खुलासे होत आहेत. “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कालपर्यंत म्हणत होते की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. आज पवार म्हणतात, की राजीनाम्याची गरज नाही. याचा अर्थ २४ तासांत अनिल देशमुख यांनी असे काय सांगितले, त्यांच्याकडे असे काय गुपित आहे, की शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली?” असा सवाल भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी विचारला आहे.

“मुख्यमंत्री का गप्प आहेत?”

 “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १५ फेबुवारीला पत्रकार परिषद घेतली आणि त्याचे पुरावे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर उपलब्ध आहेत. या गोष्टीचा विपर्यास करण्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रावर का बोलत नाहीत? कालपर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत होते. आता मुख्यमंत्री का गप्प आहेत?” असा प्रश्न ही कोटक यांनी विचारला आहे.

 “गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी”

“या आधीच्या पोलिस महासंचालकांनी पत्र दिले होते की, बदल्यामध्ये कसा भ्रष्टाचार होतो. आता माजी पोलीस आयुक्त वसुलीची माहिती पत्राद्वारे देतात. इथे तर थेट आरोप गृहमंत्र्यांवर आहेत. नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री जर त्यांना वाचवत असतील तर ते योग्य नाही” असे ही मनोज कोटक म्हणाले.

 “ज्युलिओ रिबेरो चौकशी कशी करू शकतील?”

“अनिल देशमुख यांची चौकशी झाली पाहिजे. पण ही चौकशी केंद्रीय यंत्रणा किंवा न्यायाधीशामार्फत व्हावी. ज्युलिओ रिबेरो हे माजी पोलीस अधिकारी आहेत, ते पोलीस दलात होते. ते गृहमंत्र्यांची चौकशी कशी करू शकतील?” असा प्रतिप्रश्न मनोज कोटक यांनी विचारला.

 

Rasika Jadhav

Recent Posts

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’  गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली मालिका म्हणजे…

13 mins ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

60 mins ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

15 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

17 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

17 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

18 hours ago