अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार ‘भाऊबीज भेट’

बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका घेत असतात. ते सरकार आणि सामान्य जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करत असतात. कॉँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो. हेच लक्षात शासन त्यांच्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन २०२३- २४ या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनावरील कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ वितरित करण्यात येणार आहे.

भाऊबीज भेट साठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या बाबतचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्याकरिता पेन्शन व एलआयसी योजनेसह मानधनवाढ करण्याची बाब विचाराधीन आहे. याबाबत निश्चितच येत्या काळात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण विकासमंत्री यशोमती ठाकूर १३ मार्च २०२२ रोजी संगमनेर येथे एका  कार्यक्रमात दिली होती.

अंगणवाडी सेविका पगार किती आहे?

मानधन वाढीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांकडून वारंवार आंदोलने करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने १ एप्रिल 2023 पासून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील दोन लाख सात हजार ९६१ कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन ४,०५० वरून 5,000 रुपये, मदतनीसांचे मानधन 2,००० वरून2,५०० रुपये होईल, तर मिनी अंगणवाडी सेविकेला १ ,९५०  ऐवजी २,४०० रुपये मानधन मिळेल.

 

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

7 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

9 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

9 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

10 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

11 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

12 hours ago