मंत्रालय

जर्मनीला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार !

मंगेश फदाले

जर्मनीला किमान ४ लाख कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे.महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर्मन येथे रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हावी आणि जर्मनीला कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. नुकतीच मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,जर्मनी शिष्टमंडळातील फ्रॅंक झुलर, अंद्रेस रिस्किट,ओमकार कलवाडे यांच्या समवेत जर्मन शिष्टमंडळाची बैठक संपन्न झाली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणाले की,याबाबत लवकरच महाराष्ट्र शासन आणि जर्मन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती संकलन करून, या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे शिक्षण हे अकृषी विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यातयेईल. त्यानंतर जर्मन कंपन्यांकडून मुलाखती घेऊन त्यांची निवड केली जाईल.

या निवडलेल्या विद्यार्थ्यांना जर्मन येथे जाण्याची व्यवस्था शासनाकडून केली जाईल. जर्मन येथे गेल्या नंतर त्यांना प्रशिक्षण देऊन किमान तीन महिन्याचे प्रशिक्षण होईल. मात्र यामध्ये काही विद्यार्थ्यांना अडचणी किंवा संबंधित कंपनीकडून नाकारले तर त्यांना किमान तीन महिन्यांचा भत्ता देणे अनिवार्य करावे, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.

हे ही वाचा

अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

बनावट कागदपत्रांद्वारे मुख्यमंत्री सहायता निधी हडपला

आजचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञान वापरण्याचे युग आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून युवा पिढी एकापेक्षा अधिक कौशल्य विकास प्राप्त करू शकतो. जर्मनी येथे संधी मिळालेले विद्यार्थी स्वतःच्या उत्कृष्ट आणि गुणवत्ता पूर्ण कामगिरीने आपल्या देशाची,राज्याची वेगळी ओळख निर्माण करतील असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

टीम लय भारी

Recent Posts

३० मेपर्यंत खोदलेले रस्ते दुरुस्ती न झाल्यास महापालिका नेमकी कोणावर कारवाई करणार?

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याच्या प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले (roads…

20 mins ago

दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक (State Director of Archaeology) संशयित डॉ. तेजस मदन गर्गे…

36 mins ago

100 कोटींच्या TDR घोटाळा अहवालात दडलय काय? 2 वर्षे उलटूनही गुप्तता कायम

महापालिका हद्दीतील व देवळाली शिवारातील टीडीआर (TDR) घोटाळ्याचा तपास केल्यानंतर महापालिकेने त्याचा गोपनीय अहवाल दोन…

1 hour ago

उबाठा गटाच्या विलिनीकरणाबाबत मनीषा कायंदे म्हणाल्या, शरद पवारांच्या विधानानंतर…

वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. यामुळे अनेक प्रादेशिक…

2 hours ago

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

13 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

13 hours ago