32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमनोरंजनअशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

गेली अनेक दशके अभिनायाची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok saraf) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं (Maharashtra Bhushan) सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. अशोक सराफ अनेक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहेत. अनेक कलाकार हे अशोक सराफ यांना अशोक मामा या नावानं लाडानं बोलतात. विनोदी, नायक, खलनायक अशा अनेक माध्यमातून अशोक सराफ यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. सध्या त्यांच्या चित्रपटांच्या चर्चा देखील होत आहेत. मराठी, हिंदीसारख्या सिनेमांमध्ये अशोक सराफ यांनी केलेलं काम हे अस्मरणीय आहे. वेड या सिनेमांमध्ये त्यांनी विनोदी तर कधी डोळ्यांच्या अभिनयानं गंभीर वडीलांची भूमिका पार पाडली आहे.

अशोक सराफ यांच्या अभिनयाची सुरूवात ही नाटकांमधून झाली आहे. त्यानंतर त्यांनी चित्रपटांकडे हळूहळू आपलं पाऊल टाकलं आहे. मराठी, हिंदीप्रमाणे त्यांनी भोजपूरी सिनेमांमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अशोक सराफ यांना सम्राट अशोक म्हणून देखील मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ओळखलं जातं. कधी गंभीर, तर कधी विनोदी, तर कधी नायक तर कधी खलनायक अशा अनेक भूमिकांमध्ये अशोक मामांनी आपलं काम चपखल बजावलं आहे. मराठी अभिनेते नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांचे सुरूवातीच्या काळात अनेक किस्से आहेत. 

हे ही वाचा

पुष्कर जोगचं ‘ते’ विधान आणि मनोरंजन क्षेत्रातून संतापाची लाट

छगन भुजबळांमुळे कारण नसतांना तणाव : सुधीर मुनगंटीवार

मुस्लिम आणि धनगरांना आरक्षण मिळवून देणार – मनोज जरांगे – पाटील

मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

२०२३ च्या महाराष्ट्र भूषणची घोषणा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जानेवारी दिवशी केली आहे. त्यांनी यावेळी अशोक सराफ यांचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की अशोक सराफ यांनी केवळ विनोदी स्वरुपातील भूमिका केल्या नसून त्यांनी गंभीर स्वरूपातील देखील भूमिका केल्या आहेत. असं म्हणत त्यांनी आशोक सराफ यांचं कौतुक केलं आहे.

अशोक सराफ यांचे आजही लक्षात असलेले चित्रपट

अशी ही बनवाबनवी, गंमत जंमत, नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, आमच्या सारखे आम्हीच असे अनेक चित्रपट असून आता अनेक दशकांनंतरही अशोक मामांच्या कामाप्रती तितकंच निखळ प्रेम आहे. तसेच आजही चाहत्यांच्या मनावर अशोक मामांच्या अभिनयानं आणि त्यांच्या साधेपणानं गारूड घातलं आहे. तर हिंदी सिनेमांमधील करण अर्जुन, सिंघम सारख्या हिंदी सिनेमांमध्ये अशोक सराफ यांनी काम केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी