32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रबनावट कागदपत्रांद्वारे मुख्यमंत्री सहायता निधी हडपला

बनावट कागदपत्रांद्वारे मुख्यमंत्री सहायता निधी हडपला

राज्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्थसहाय्य निधी प्राप्त करण्यासाठी योग्य त्या कागदपत्रांची आवश्यकता असते. मात्र ते कागदपत्रे नसल्यास मुख्यमंत्री निधीचा अर्थसहाय्य निधी प्राप्त होणं अशक्य असतं. मात्र अशातच बनावट कागदपत्रांद्वारे मुख्यमंत्री निधीचा अर्थसहाय्य निधी प्राप्त करणे हा गुन्हा आहे. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्थसहाय्य प्राप्त झाल्याची कबूली आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे. ठाण्यात हा प्रकार घडला आहे. त्या रूग्णालयावर पोलीसांनी कारवाई करण्याबाबत सांगितलं आहे. यावर आता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल गलगलीने माहिती मागितली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत बोगस प्रकरण किंवा शासनाची फसवणूक केली आहे त्याची माहिती मागितली होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे सहाय्यक लेखा गणपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आंबिवली पूर्व ठाणे या ठिकाणच्या रूग्णालयानं संजय तांबे यांनी अनिल गलगली यांस कळविले की रूग्णालयाने बनावट कागदपत्राद्वारे अर्थसहाय्य प्राप्त केल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान रूग्णालयातील डॉक्टर कर्मचारी आणि डॉक्टरांच्या सानिध्यात असलेल्या व्यक्तींवर देखील गुन्हे दाखल करण्यात यावेत.

हे ही वाचा

छगन भुजबळ यांनी दिला राजीनामा? अजित पवार गटाच्या नेत्यानं दिला दुजोरा

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर याचं आकस्मित निधन

अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी संपूर्ण विवरणासहित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची आवश्यकता असल्याचं मत मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून गलगली यांच्यामते संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात येणार आहे. यामुळे असे अनेक प्रकरणं बाहेर येतील आणि बोगसगिरीवर आळा बसेल. याचा फायदा खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांना होण्यास मदत होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी