मंत्रालय

पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याकडून कंत्राटदारांची छळवणूक!

टीम लय भारी

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि भ्रष्टाचार यांचे अतूट नाते आहे. संधी मिळेल तिथे पीडब्ल्यूडीचे अधिकारी ओरबाडण्याचे काम करतात. अशाच वृत्तीच्या एका अधिकाऱ्यामुळे कंत्राटदारांची मात्र पाचावर धारण बसली आहे. सुरेश डावखर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे (Harassment of contractors by PWD officials).

डावखर यांनी कंत्राटदारांना इतके ओरबाडले आहे की, घायकुतीला आलेल्या या कंत्राटदारांनी आपली कैफियत आता पत्रकारांना सांगण्यास सुरूवात केली आहे. सरकारने डावखर यांना मलबार हील येथील मलईदार पदावर आणून बसविले आहे. उप अभियंता म्हणून ते तिथे कार्यरत आहेत. डावखर यांच्याकडे सरकारने ही तात्पुरती जबाबदारी दिली आहे.

पीडब्ल्यूडीचा प्रताप; कनिष्ठ अधिकाऱ्याकडे वरिष्ठाची जबाबदारी, ती सुद्धा हद्द बदलून

लाचखोर महिला प्रांताधिकारी एसीबीच्या जाळ्यात

डावखर यांच्याकडे मिळालेल्या या तात्पुरत्या जबाबदारीचा ते यथेच्छ गैरफायदा उचलत आहेत. कंत्राटदारांची बिले अदा करण्यासाठी डावखर यथेच्छ ओरबाडत आहेत. कंत्राटदारांची अवस्था ‘अडला नारायण, गाढवाचे पाय धरी’ अशी झाली आहे. मजबूर असलेले अनेक कंत्राटदार नाईलाजास्ताव डावखर यांची मागणी पूर्ण करीत आहेत. पण मागणी पूर्ण केल्यानंतरही डावखर बिले अदा करीत नाहीत (But even after the demand is met, the leftists do not pay the bills).

डावखर यांना आमची बिले द्यायची नसतील तर किमान पूर्ण केलेल्या मागणीचा परतावा तरी द्यावा, अशी हतबलता कंत्राटदारांकडून व्यक्त केली जात आहे.

मंत्रालय

‘ओटावर वेदना होतात म्हणून ‘देवेंद्रां’चे नाव हातावर गोंदले’ – राष्ट्रवादीचे माथाडी कामगार नरेंद्र पाटील

Uddhav Thackeray govt, governor lock horns, yet again

‘कोरोना’मुळे सरकारकडे पैशाची कमतरता आहे, असे सांगून पीडब्ल्यूडीचे अधिकारी कंत्राटदारांची बिले अदा करीत नाहीत. वास्तवात मात्र; महत्वाची, तातडीची, अत्यावश्यक अशी गोजीरवाणी नावे देवून पीडब्ल्यूडीने सरकारी तिजोरीतून अमाप पैसा पदरात पाडून घेतला आहे. हा पैसा मात्र कामावर कमी, आणि अधिकाऱ्यांच्या खिशात जास्त जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली (However, the money is less at work and more in the pockets of officials, sources said).

डावखर सुद्धा हेच करीत असल्याचाही आरोप या सूत्रांनी केला आहे. डावखर यांनी बिले दिली नाहीत. त्यामुळे आम्ही बेजार झालो आहे. सरकारने डावखर यांच्या ओरबाडण्याच्या वृत्तीला चाप लावावा. मलबार हिल येथील मलईदार पदावर डावखर बसले आहेत. या पदावर सहजासहजी कोणालाही संधी मिळत नाही. दांडगा वशिला असावाच लागतो. डावखर सुद्धा दांडग्या वशिल्यानेच या पदावर आले आहेत. त्यांचा वशिला कितीही दांडगा असला तरी सरकारने त्यांच्या ओरबाडण्याच्या वृत्तीला चाप लावावा अशी भावना कंत्राटदारांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, डावखर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझ्यावर केला जाणारा हा आरोप पूर्णत: खोटारडा आहे. मी कुठल्याही कंत्राटदाराला त्रास दिलेला नाही. लोकशाहीमध्ये कोणाला काहीही बोलण्याचा अधिकार आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे…

17 mins ago

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

1 hour ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

1 hour ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

3 hours ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

3 hours ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

5 hours ago