सिनेमा

चाहत्यांच्या प्रेमाखातर अमृता खानविलकर आता यूट्यूबवर

टीम लय भारी

मुंबई : मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळवलेली आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या चाहत्यांच्या खास मागणीवरून यूट्यूबवर पदार्पण करत आहे. सौंदर्य, अभिनय, नृत्याविष्कार असे अनेक गुण असलेल्या या अभिनेत्रीने अधिकृतरित्या स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू करून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी खुशखबर चाहत्यांना दिली आहे (Amrita Khanwilkar is now on YouTube for the love of fans).

गेल्या काही महिन्यांपासून अमृता तिच्या नृत्यकलेचे व्हिडिओ ‘अमृतकला’ च्या अंतर्गत शेअर करते. या मध्ये अमृता, लावणी कलाकार आशिष पाटील याच्या सोबत नृत्य करताना दिसते. या तिच्या व्हिडिओला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम मिळत आहे. चाहत्यांच्या याच प्रेमाखातर अमृताने स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला.

मोगॅम्बो खुश हुआ म्हणत प्रशांत दामलेंनी व्यक्त केली सरकारवर नाराजी

बाळासाहेबांनी युंडूगुंडू विरोधी मोहीम हाती घेतली आणि शिवसेनेची स्थापना झाली

आपल्या या नवीन उपक्रमाबाबत बोलताना अमृता म्हणाली की, खरे सांगायचे झाले तर ‘अमृतकला’ ला मिळालेल्या चाहत्यांच्या प्रतिसादानंतर स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू करण्यासाठी ती प्रेरित झाले. चाहत्यांना नेहमीच त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या लाईफस्टाईल विषयी कुतूहल असते आणि म्हणूनच ती देखील तिच्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करण्यासाठी तिने हा निर्णय घेतला आहे. सध्यातरी महिन्याला किमान चार-पाच व्हिडिओ शेअर करण्याचा विचार आहे, असे तिने सांगितले.

अमृता खानविलकरचे युटयूबवर पर्दापण

दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांचे मानले आभार

Amruta Khanvilkar looks mesmerizing in this black saree; see pics

आपल्या आवडत्या कलाकाराचा दिनक्रम, आवडीनिवडी, व्यायाम, डाएट, लाईफस्टाईल, कपडे, फिरणे, शॉपिंग, परिवार अश्या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना बघायला आवडतात. या विषयातील पहिला व्हिडिओ तिने शेअर केला आहे. त्याला चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद आला आहे (He has received a great response from the fans).

मराठीसह हिंदी चित्रपटात काम केलेली आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर

 

 

Rasika Jadhav

Recent Posts

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

15 mins ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

38 mins ago

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

2 hours ago

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

3 hours ago

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

4 hours ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

5 hours ago