33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसिनेमामोगॅम्बो खुश हुआ म्हणत प्रशांत दामलेंनी व्यक्त केली सरकारवर नाराजी

मोगॅम्बो खुश हुआ म्हणत प्रशांत दामलेंनी व्यक्त केली सरकारवर नाराजी

टीम लय भारी

मुंबई : अनलॉकच्या या काळात दुकाने, हॉटेल आणि जिमला दिलासा मिळाला आहे. परंतु नाट्यगृह, चित्रपट गृह अद्यापही बंद आहेत. हे अनलॉक करण्याची मागणी करणाऱ्या प्रशांत दामले यांनी सरकारवर उपरोधीत शब्दात टीका करत नाराजी व्यक्त केली आहे (Prashant Damle requesting government to reopen theaters).

प्रशांत दामले आणि इतर कलाकार मंडळी सुध्दा नाट्यगृह सुरू करण्याची मागणी करत आहेत. अनेक वेळा प्रशांत दामले यांनी वैयक्तिक रित्या याची मागणी केली आहे. परंतु सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नसल्याने आता दामलेंनी उपरोधित टीका करून सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय युवा पुरस्काराने महाराष्ट्रातील 4 युवक सन्मानित

सफाईगाराची मुलगी, धुणी भांडी करणाऱ्या महिलेचा मुलगा जाणार परदेशी शिक्षणासाठी, धनंजय मुंडेंच्या निर्णयाचा फायदा

Prashant Damle requesting government to reopen theaters
प्रशांत दामले

या पोस्टमध्ये राज्यातील उपहारगृह, दुकाने, जिम मालकांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. मोगॅम्बो खुश हुआ!! असे लिहत त्यांनी पुढे सरकारवर टोला लावत लिहले आहे की, म्हणजे आता हळूहळू नाट्यगृह, सिनेमागृह उघडण्याचा शेवटचा (अनावश्यक) टप्पा लवकरच येईल अशी आशा बाळगूया. कंसांत लिहलेले तो अनावश्यक शब्द प्रशांत दामले यांची नाराजी दर्शवत आहे. त्यापुढे त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संस्कृतीक मंत्री आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहे.

Prashant Damle requesting government to reopen theaters
प्रशांत दामलेंची फेसबुक पोस्ट

राज्यातील पहिला सरकारी घोटाळा बाहेर काढणाऱ्या संपादकांचे निधन

Theatres reopen: Actor Prashant Damle to perform at Yashwantrao Chavan auditorium today

प्रशांत दामलें सोबतच अनेक इतर कलाकार मंडळी देखील अनलॉक मध्ये नाट्यगृह सुरू करण्याची मागणी करत आहेत. कलाकारांसोबत अनेक सेटवर छोटे छोटे काम करणाऱ्या लोकांच्या पोटावर सरकार पाय देत आहे. अशी मते या क्षेत्रात काम करणारी मंडळी मांडत आहेत. आजूबाजूला सगळे सुरू झाले असताना फक्त नाट्यगृह बंद का? फक्त नाट्यगृहातूनच कोरोना पसरतो का? असे प्रश्न ही मंडळी उपस्थित करत आहेत. त्यामुळे सरकार आता नाट्यगृह आणि चित्रपटगृह कधी सुरू करतायत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे (All eyes are now on when the government will start theaters and cinemas).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी