सिनेमा

इम्रान खानची 49 वर्षीय घटस्फोटित पत्नी रेहम खान तिसर्‍यांदा चढली बोहल्यावर; 14 वर्षे लहान असलेल्या मिर्झा बिलालशी केला निकाह !

माजी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांची 49 वर्षीय घटस्फोटित पत्नी रेहम खान तिसर्‍यांदा बोहल्यावर चढली आहे. वयाने 14 वर्षे लहान असलेल्या मिर्झा बिलालशी आता रेहम खानने निकाह केला आहे. पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश नागरिक असलेला बिलाल सध्या अमेरिकेत स्थायिक आहे. (Imran Khans Ex Wife Reham Khan Weds to Mirza Bilal 14 Years Younger)

रेहम खानही 49 वर्षांची आहे तर बिलाल पस्तीशीत आहे. रेहमने बिलालशी निकाहाचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. बिलाल हा पत्रकार-व्यंगचित्रकार तसेच अभिनेताही आहे. रेहमने 2014 मध्ये इम्रान खानसोबत लग्न केले होते. वर्षभरही न टिकलेले हे लग्न 2015 मध्येच तुटले होते. आता अमेरिकेतील सिएटल शहरात एका साध्या सोहळ्यात रेहमने बिलालसोबत निकाह केला आहे. ट्विटरवर बिलालसोबतच्या निकाहचे फोटो शेअर करून रेहमने लग्नाची बातमी जाहीर केली आहे. फोटोत दोघेही एकमेकांच्या हातात हात गुंफून एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसत आहेत. रेहम आणि बिलाल या दोघांचे हे तिसरे लग्न आहे.

बिलाल आधी एक मॉडेल होता आणि ‘द 4 मॅन शो’, ‘दिल पे मत ले यार’ आणि ‘नॅशनल एलियन ब्रॉडकास्ट’ सारख्या शोमध्ये त्याने भाग घेतला होता. मनोचिकित्सक इजाज रहमान यांच्याशी 1993 मध्ये रेहमचे पहिले लग्न झाले होते. त्यांनी 2005 मध्ये घटस्फोट घेतला. तिने 2014 मध्ये दुसरे लग्न इम्रान खानसोबत केले. हे लग्न फक्त 10 महिने टिकले. 2015 मध्ये ते वेगळे झाले. रेहमशी घटस्फोट घेतल्यानंतर इम्रान खाननेही बुशरा बीबीशी तिसरे लग्न केले होते. त्यावेळी रेहमने त्यांच्यावर अविश्वासू असल्याचा आरोप केला होता. रेहमने 2018 मध्ये ‘रेहम खान’ हे आत्मचरित्र प्रकाशित केले होते. इम्रान खानसोबतच्या तिच्या वैवाहिक जीवनाभोवतीच ते लिहिलेले आहे. यात इम्रानवर अंमली पदार्थ सेवन आणि गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा :  

पाकिस्तानातील राजकिय पेचप्रसंगासाठी पंतप्रधान मोदी जबाबदार! पीटीआयचा आरोप

पाकिस्तानचे पंतप्रधान उघड्यावर, निवासस्थान दिले भाड्याने

Viral Video : पाकिस्तानी अभिनेत्रीची नेटकऱ्यांनी केली धुलाई

 

 

Imran Khans Ex Wife Reham Khan Weds to Mirza Bilal 14 Years Younger

 

 

टीम लय भारी

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

7 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

7 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

8 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

8 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

8 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

10 hours ago