सिनेमा

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचा पद्मभूषणने सन्मान

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचा पद्मभूषणने सन्मान करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते त्यांनी पद्मभूषण सन्मान स्वीकारला. (PadmaBhushan Suman Kalyanpur)

सुमन कल्याणपूर यांची मराठी भावगीत गायनाची सुरुवात ग दि. माडगुळकरांच्या गीतापासून झाली. नुकताच त्यांना पुलस्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सुमन कल्याणपूर यांनी हिंदी, मराठी चित्रपटगीतांबरोबरच अनेक मराठी भावगीतेही गायली आहेत. गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी या भाषांतही त्यांनी गाणी गायिलेली आहेत.

अत्यंत गोड गळा आणि शब्दातील भावार्थ अचूकपणे समजून गाणाऱ्या सुमन कल्याणपूर यांचा जन्म बांगलादेशातील भावनिपूर येथे 28 जानेवारी 1937 रोजी झाला.  सुमन कल्याणपूर यांचे माहेरचे आडनाव होते हेमाडी. लग्नापूर्वी ती सुमन हेमाडी नावानेच गात असे. घरातील वातावरण एकदम कलासक्त/रसिक आणि धार्मिक असल्यामुळे लहान वयातच त्यांच्यावर चांगले संस्कार झाले होते.

फोटो क्रेडिट : गुगल

लहानपणी त्या खूप छान चित्र काढायच्या. पुढे मुंबईत आल्यावर त्यांनी जे. जे. स्कूलमध्ये काही काळ चित्रकलेचे धडे गिरवले. घरात रेडीओ अव्याहतपणे चालू असायचा. सैगल, नूरजहान, खुर्शीद, सुरैया यांच्या अप्रतिम गाण्यांनी धुंद झालेला तो काळ होता. त्या सदैव गाणी गुणगुणायच्या. नाटककार मो. ग. रांगणेकर, केशवराव भोळे, ज्योत्स्ना भोळे या कलावंत मंडळीची त्यांच्या घरी उठबस होती.

 

सुमन कल्याणपूर यांचा संगीत शिक्षणाची सुरुवात यशवंत देव यांच्याकडे झाली. त्यांनीच पहिल्यांदा चित्रपटकरीता गाण्याची संधीही दिली. हा सिनेमा दुर्दैवाने प्रदर्शित झालाच नाही. पण या गाण्याच्या ध्वनी मुद्रणाच्या वेळी हिंदी चित्रपटाचे संगीतकार महंमद शफी तिथे हजर होते. त्यांना सुमन कल्याणपूर यांचा आवाज आवडला व लगेच त्यानी त्यांच्या ‘मंगू’ सिनेमाकरीता त्यांना साईन केले. “कोई पुकारे धीरेसे तुझे आँख के तारे” सुमन कल्याणपूर यांचे रूपेरी पडद्यावरच पाहिले गाणे.

PadmaBhushan Suman Kalyanpur, ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचा पद्मभूषणने सन्मान, सुमन कल्याणपूर, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, गायिका सुमन कल्याणपूर
विक्रांत पाटील

Recent Posts

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

3 hours ago

नाशिक महापालिकेचा पाणी पुरवठ्यावर पाणीगळती रोखण्यासाठी स्काडामीटर बसवण्याचा प्रस्ताव

नाशिक शहरात धरणातून उचलले जाणारे पाणी व नागरिकांकडून होत असलेला पाणीवापर याचा विचार केल्यास पाणीगळतीचे…

3 hours ago

सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे डबक्यात पडून बहीण-भावाचा म़ृत्यू

सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे रवींद्र त्र्यंबक भंडकर यांची धनश्री भंडकर (वय 4 ), आविष (5)…

3 hours ago

शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढत माढा मध्ये रंगणार…

ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने आता माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली…

4 hours ago

नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणी दोघांना अटक

सनी गंगाघाटावरून जात असताना एकाला धक्का लागला. त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांची भेट पून्हा…

4 hours ago

चक्क छगन भुजबळांच्या स्विय सहायकालाच पन्नास हजारांचा गंडा

येवला शहरात छगन भुजबळांच्या निकट वरती (Chhagan Bhujbal's personal assistant) यांना एका महाठकाने 50 हजाराला…

4 hours ago