मुंबई

राष्ट्रवादीच्या कार्यालयात सामान्य जनतेला ‘शाही’ वागणूक!

साहेब चहा पाहिजे की कॉफी…. पाणी हवे का… हा संवाद कुठल्या हॉटेलमधील नाही. हा संवाद आणि सरबराई आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाची. मंत्रालय समोरील दोन सरकारी बंगल्यात हे कार्यालय विस्तारलेले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत या कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा राबता असतो. राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते येत असल्याने त्यांना हे कार्यालय आपले हककाचे आहे असे वाटावे यासाठीच चहा, कॉफी त्याबरोबर पिण्यासाठी पाणीही देण्यात येते. या पक्ष कार्यालयातील स्वयंपाक गृहात दिवसभर चहा, कॉफी बनवण्याचे काम सुरू असते. राज्यातील खेडोपाड्यातून कार्यकर्ते येत असतात. ते थकलेले असतात. त्यामुळे चहा, कॉफी घेतल्यावर त्यांना तरतरी येते.

मंत्रालयात विविध कामे घेऊन तसेच विविध समस्या घेऊन सर्वपक्षीय कार्यकर्ते येत असतात. या कार्यकर्त्यांना मंत्रालय जवळ असावे असे वाटत असल्याने मंत्रालय परिसरात कार्यालये घेतली आहेत. नव्हे तर सरकारने त्यांना ती उपलब्ध करून दिली आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची कार्यालये ही मादाम कामा रोड मंत्रालयासमोरच आहेत.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट राष्ट्रवादीत सक्रिय आहे. या पक्षाच्या बांधणीचे काम सध्या जोरात सुरू असून पदाधिकारी नियुक्त्या, आंदोलने याची रुपरेखा सध्या राष्ट्रवादीच्या याच कार्यालयातून होत आहे.

हे ही वाचा 

समीर भुजबळ यांनी नवाब मलिकांचे केले कौतुक !

“राज्य सरकार सोडून सगळा महाराष्ट्र आजारी…” नांदेड घटनेवरून राज ठाकरे सरकारवर बरसले!

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणतात, बहुजनांनो एक व्हा ! भारत तुमचा आहे

२ जुलै रोजी अजित पवार यांच्या सह राष्ट्रवादीच्या ९ आमदार मंडळींनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रीपदे पदरात पाडून घेतली. त्यानंतर पक्षाचे एक कार्यालय असावे यासाठी मंत्रालय समोर राष्ट्रवादीला सरकारी बंगल्यात कार्यालय थाटण्याची परवानगी देण्यात आली. कार्यालयात दररोज शेकडो कार्यकर्ते येत असतात. त्यांना चहा, कॉफी तरी मिळावी असा वरिष्ठ नेत्यांचा आग्रह आहे. त्यानुसार ही सरबराई होत असते. दररोज साधारण ३ हजार कप चहा आणि ३०० कप कॉफी तयार होते, अशी माहिती एकाने दिली. यशवंतराव चव्हाण सेंटरमधील कॉन्ट्रॅक्टरलाच हे चहा आणि कॉफीचे काम देण्यात आलेले आहे.

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांना भेटायला कार्यकर्ते मोठ्या संख्येने येत असतात. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांचा जनता दरबार याच कार्यालयात भरत असतो. त्यामुळे राज्यातील विविध भागातून दररोज शेकडो कार्यकर्ते या कार्यालयात येत असतात. लांबून आलेला कार्यकर्ता अनेकदा दमून भागून आलेला असतो. त्याला तरतरी यावी यासाठी चहा आणि कॉफीचा प्रपंच असतो. शिवाय भारतीय संस्कृतीत घरात आलेलेल्याची सरबराई आपण करत असतोच. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हे आपले घरच आहे, असे वाटावे यासाठी ही ‘टी डिप्लोमीसी’ असल्याचे बोलले जाते.

विवेक कांबळे

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago