जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष यांच्या नेमणूका करणे आणि पक्षाला घराघरात पोचवण्यासाठी येणाऱ्या काळात काम करणार आहोत, असा आशावाद माजी खासदार समीर भुजबळ यांनी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची आज धुरा स्वीकारली त्यावेळी व्यक्त केला. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम चांगले केले आहे. आता त्यांचे कार्य मी पुढे घेऊन जाणार आहे. आता वेगवेगळ्या नेमणूका करण्याची जबाबदारी माझ्यावर आली असून ती जबाबदारी पेलण्याचे काम करणार असल्याचे समीर भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शिवाय झोपडपट्टी, चाळी यांचे प्रश्न, महानगरपालिकेच्या माध्यमातून, म्हाडाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी पक्षाची ताकद वापरणार असल्याचे सांगतानाच सर्व जातीधर्मांतील लोकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचे काम करणार असल्याचे सूतोवाच भुजबळ यांनी केले.
राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मुंबई विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर आज समीर भुजबळ यांनी पदाची धूरा हाती घेतली. यावेळी समीर भुजबळ यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अध्यक्ष पदाची संधी दिल्याबद्दल विशेष आभार मानले.
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद हे एक चॅलेंज आहे. शहरातील सामान्य जनतेचे प्रश्न आहेत. पक्ष तळागाळापर्यंत बांधण्याचे उद्दिष्ट आणि ध्येय ठेवून पुढे जाणार आहोत असेही समीर भुजबळ यांनी सांगितले.
हे ही वाचा
नरेंद्र मोदींनी शिक्षकांना लिहिली मराठीतून पत्रे, कारण…
“राज्य सरकार सोडून सगळा महाराष्ट्र आजारी…” नांदेड घटनेवरून राज ठाकरे सरकारवर बरसले!
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणतात, बहुजनांनो एक व्हा ! भारत तुमचा आहे
नवाबभाई मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम चांगले केले आहे. आता त्यांचे कार्य मी पुढे घेऊन जाणार आहे. आता वेगवेगळ्या नेमणूका करण्याची जबाबदारी माझ्यावर आली असून ती जबाबदारी पेलण्याचे काम करणार असल्याचे समीर भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, शिवाजीराव नलावडे, बापू भुजबळ, आप्पा पाटील आदींसह मुंबई शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.