मुंबई

बाळासाहेब थोरातांनी मुंबईकरांना दिली खुषखबर !

टीम लय भारी

मुंबई : मुंबई उपनगरातील(Mumbai) राहणाऱ्या नागरिकांना बजावण्यात आलेल्या अकृषिक कराच्या नोटींसींना स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी आज विधानसभेत(Vidhansabha) केली. कायम स्वरुपी या नियमात बदलण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल, असेही जाहीर केले. ‍विधानसभेत आज भाजपा(BJP) आमदार तथा आशिष शेलार(Aashish Shelar) यांनी लक्षवेधी सुचना मांडून मुंबई उपनगरातील अकृषिक कराच्या नोटींसींचा विषय मांडला.

मुंबई उपगरात राहणा-या सुमारे ६० हजाराहून अधिक रहिवांश्याना शासनाकडून अकृषिक कराच्या नोटीस सतत बजावण्यात आल्या असून या नोटीसा अन्याय कारक आहेत याकडे आमदार आशिष शेलार यांनी बारकाईने लक्ष दिले. ज्यावेळी उपगरामध्ये इमारती, चाळी व अन्य रहिवाशी बांधकामे करण्यात आली त्यावेळी प्रत्येक बांधकामाने अकृषिक कर भरला. त्यानंतर पण प्रत्येक वेळा त्यांना या कराच्या नोटीसा बजावल्या जातात. याबाबत मागिल सरकारच्या काळापासून विविध पातळीवर पाठपुरवा केल्यानंतर ही पुन्हा पुन्हा अशा नोटीस बजावण्या येतात. या खात्यातील अधिकारी असे का करतात ? असा प्रश्न आमदार शेलार यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील सारस्वत गृहनिमाण सोसायटी, सेंट सॅबेस्टीयन सोसायटी, सॅलसेट सोसायटी या मोठया सोसायटयांना बजावण्यात आलेल्या नोटीसी विधानसभेत मांडला.

या नोटीसी पुर्वीच्या दरापेक्षा १५०० टक्के अधिकच्या दराने बजावण्यात आल्या असून त्या अवाजवी आहेत. कोरोनामुळे एकिकडे रहिवाशांचे आर्थिक घडी विस्कळीत झाली असता अशा प्रकारचा बुर्दंड सरकारतर्फे लादला जात आहे. तसेच अशा प्रकारचा कर मुंबई शहरातील सोसायट्यांना नाही, केवळ उपनगरातील बांधकामांना आकारण्यात येत असून एकाच शहरात दोन नियम कसे? असा प्रश्न आमदार शेलार यांनी केला. त्यामुळे शासनाने तातडीने या नोटीसांना स्थगिती द्यावी, तसेच हा कर कायमस्वरुपी रद्द करावा अशी आग्रही मागणी आमदार शेलार यांनी केली. त्यांच्या मागणीला सर्वपक्षीय आमदारांनी पाठींबा तर दिलाच तसेच भाजपाचे आमदार योगेश सागर, अतुल भातकळकर, पराग अळवणी, विद्या ठाकूर, मनिषा चौधरी, भारती लवेकर यांनी आक्रमक भूमिका घेत या नोटीसांना तातडीने स्थगिती द्या अशी आग्रही भूमिका घेतली.

ज्यावेळी बांधकामे झाली त्यावेळी सरकारने एकदा जर अकृषिक कर घेतला तर पुन्हा पुन्हा कर का वसूल केला जात आहे. मुंबई शहर विभागात हा कर घेतला जात नाही मग उपनगरासाठी हा कर का असे प्रश्न लावून धरत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या नोटीसांना स्थगिती देण्यात येत असल्याच जाहीर केले. तसेच कायम स्वरुपी याबाबत तोडगा काढण्यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. या निर्णयाचे भाजपा आमदारांकडून स्वागत करण्यात आले आहे

Jyoti Khot

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

6 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

7 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

7 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

7 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

7 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

11 hours ago