मुंबई

मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचे घर सिलेंडर स्फोटात जळून झाले राख

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या मुंबई पोलीस दलातील शिपायाचे (Bombay policeman) घर सिलेंडरच्या स्फोटात जळून राख झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भायखळा पोलीस स्टेशनमधील शिपाई विजय गोडेकर यांच्या घरात शुक्रवारी (दि. २२ जुलै २०२२) सिलेंडरचा स्फोट (Bombay policeman’s house burnt to ashes in cylinder blast) झाला. यावेळी दैव बलवत्तर म्हणून घरात कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. परंतु या घटनेत घराचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय गोडेकर यांच्या घरी शुक्रवारी दुपारच्यावेळी सिलेंडर लावण्यात आला. त्यानंतर त्यांची पत्नी, आई आणि मुलगा हे महालक्ष्मी मंदिरात गेले. याचवेळी दुपारी लावण्यात आलेल्या सिलेंडरमधून गॅस गळती झाली. गोडेकर यांचे कुटुंबीय मंदिरातून जाऊन घरी आले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने घराचा दरवाजा उघडला पण गॅसचा वास येत असल्याने त्या लगेच घराबाहेर पडल्या. पण याचवेळी त्यांच्यासमोर सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.

या घटनेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पोलीस शिपाई विजय गोडेकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी विवेक फणसाळकर यांनी गोडेकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. या घटनेत घराची अवस्था अत्यंत वाईट झाल्याने पोलीस दलाकडून गोडेकर यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar) यांनी सांगितले.

गोडेकर यांच्या शेजाऱ्यांनी आपल्या दारात संध्याकाळी दिवा लावला होता. दरवाजा उघडल्यानंतर घरात जमा झालेल्या गॅसचा संपर्क या दिव्याशी आल्याने हा भीषण स्फोट झाला. या घटनेत विजय गोडेकर यांच्या आईच्या साडीला आग लागली. परंतु उपस्थित असलेल्या लोकांकडून लगेच ही आग वीजविण्यात आली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही वेळेसाठी भीतीचे वातावरण पसरले होते. ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ याची प्रचिती या घटनेमुळे सर्वांनाच आली.

हे सुद्धा वाचा :

काँग्रेस नेत्या अलका लांबाने केला स्मृती इराणींच्या मुलीवर आरोप

राजकारणाचे तीन तेरा, जनता देखती सिर्फ मेरा

भगवा झेंडा काढल्याने शिरढोणकरांनी दिला सामूहिक आत्मदहनाचा इशारा

पूनम खडताळे

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

7 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

8 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

8 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

9 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

9 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

11 hours ago