मुंबईची अक्षरशः तुंबई झाली… चित्रा वाघ बरसल्या; नेमका रोख कोणाकडे?

टीम लय भारी

पुणे : राज्यात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाची संततधार कायम असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. नेहमीप्रमाणे यंदा सुद्धा मुंबई तुंबल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ चांगल्याच बरसल्या आहेत. दरम्यान, वाघ यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नवे आता सरकार कामाला लागले आहे. राज्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा संरक्षक सचिव यांची आज बैठक बोलावली आहे.

माध्यमांतील याच बातमीचा संदर्भ घेत मुंबईत पहिल्या पावसात पाणी साचून तुंबई झाल्याने बीएमसी प्रशासनावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली आहे. यासंदर्भात सोशल मिडीयावर ट्विट करत वाघ यांनी जनता हिशोब करणारच… असे म्हटले आहेस त्यामुळे वाघ यांचा रोख नेमका कोणाकडे हे पाहणेच आता महत्त्वाचे ठरणार आहे.

चित्रा वाघ ट्विटमध्ये लिहितात, दोन दिवसाच्या पावसाने मुंबईची अक्षरशः तुंबई झाली आहे. शिवसेना प्रणित @mybmc ने कोट्यावधी खर्च करून केलेली नालेसफाई, पाणीउपसा करण्यासाठी लावलेले पंप या पावसात वाहून गेले आहेत. नालेसफाईच्या ऐवजी महापालिका तिजोरी सफाई झाली. पंप लावून टक्केवारीचा उपसा केला.. जनता हिशोब करणारच… असा घणाघात वाघ यांनी बीएमसी आणि राज्यकर्ते शिवसेनेवरच केला आहे.

हे सुद्दा वाचा…

VIDEO : नाना पटोले दिंडीत झाले सहभागी !

क्रुरतेची सीमापार! भुंकणाऱ्या श्वानावर राॅड हल्ला

राज्यात पुन्हा ‘मुसळधार’चा हाहाकार?

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

5 mins ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

23 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago