Categories: क्राईम

क्रुरतेची सीमापार! भुंकणाऱ्या श्वानावर राॅड हल्ला

टीम लय भारी

दिल्ली : मुक्या जीवांना जपणारे हात नेहमीच चर्चेत असतात पण यावेळी चर्चा झाली हल्ला करणाऱ्या क्रुरतेची. दिल्ली येथे कुत्र्यावर अमानुषपणे हल्ला केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हल्लाची ही घटना वाऱ्यासारखी सोशल मिडीयावर व्हायरल झाली असून यावर निषेध नोंदवत या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत.

दिल्ली येथील पश्चिम विहार परिसरात राहणारे धरमवीर दहिया घराबाहेर पडताच शेजारच्यांचा पाळीव कुत्रा अचानक भुंकू लागला. कुत्र्याच्या अशा भुंकण्याने दहिया यांचा राग अनावर झाला. त्यांनी त्या कुत्र्याची शेपूट पकडली आणि त्याला जोरात जमिनीवर आपटले. दरम्यान कुत्र्याला मारहाण करत असल्याचे लक्षात येताच कुत्र्याचा मालक रक्षित हे बाहेर आले आणि त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु दहिया यांचा राग आणखी वाढला होता.

हाती आलेल्या माहितीनुसार, नेमकं काय घडलं हे सांगताना श्वानाचे मालक रक्षित म्हणाले, दहिया कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करत होते, त्यांना रोखण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. तेवढ्यात कुत्र्यावर उगारलेली वीट आपल्याला लागल्याचा आरोप रक्षित यांनी यावेळी केला.

रक्षित पुढे म्हणाले, कुत्र्याला आपटून मारहाण केल्यानंतर दहिया घरी निघून गेले आणि येताना यावेळी राॅड घेऊन आले. त्यावेळी त्यांना थांबवण्यासाठी रक्षित यांचे  मामा – मामी पुढे आले, मामी त्यांना अडवू लागली पण त्यांना न जुमानता मामींना दहिया यांनी पायाने फरफटत तसेच पुढे नेले. त्यानंतर त्यांनी रागाने कुत्र्याच्या डोक्यात राॅड मारला, त्यावेळी अडवताना मामा पुढे आल्यामुळे मामांना सुद्धा त्यांनी राॅडने मारहाण केली.

या घटनेत श्वानासह मामा – मामी रक्तबंबाळ झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संपुर्ण घटना तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिस आणखी तपास करीत आहेत. दरम्यान हा संपुर्ण प्रकार सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे नेटकरी संताप व्यक्त करीत आहेत.

हे सुद्धा वाचा…

राज्यात पुन्हा ‘मुसळधार’चा हाहाकार?

ESIC मध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी

‘ते’ वेळेत पोहोचले नाही… तर ‘ते’ रुसतात, असेही अनोखे प्रेम

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

10 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

10 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

10 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

10 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

12 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

12 hours ago