मुंबई

मुंबईतील कामे वेळेत पूर्ण करा; पालिका अधिकाऱ्यांना पालकंत्री केसरकरांच्या सूचना

सध्या मुंबईमध्ये महापालिकेकडून अनेक विकासकामे सुरू आहेत. तसेच मुंबई विकासांच्या कामासोबतच सोबतच मुंबईच्या सौंदर्यीकरणावरवर ही विशेष लक्ष दिल जात आहे. मुंबई भविष्यात आणखी सुंदर आणि स्वच्छ कशी होईल यावर भर दिला जात आहे. यासाठी पालिकेकडून विविध योजना देखील राबविल्या जात आहेत. मात्र या योजना राबवताना सुरू असलेली कामे वेगाने आणि वेळेत पूर्ण करा, अशा सूचना नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या बैठकीत मुंबईचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या निर्धारानुसार मुंबईमध्ये सौंदर्यकरण, स्वच्छता, इमारती आणि पथदिवे, कोळीवाड्यांचा विकास या सर्व माध्यमातून मुंबई शहराचे अधिक सुंदर रूप जगासमोर आणणार आहे. आणि या सर्वाचाच एक भाग म्हणून महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा स्वतः पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला. महानगरपालिकेच्या पार पडलेल्या या बैठकीत मंत्री केसरकर, इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आशिष शर्मा, संजीव कुमार, पी.वेलारासू आदि उपस्थित होते.

यावेळी पालिकेतील अधिकाऱ्यांना सुचना देताना देताना केसरकर म्हणाले; मुंबईत सौंदर्यीकरण आणि नियमित स्वच्छता व्यतिरिक्त इतर स्वच्छतेच्या कामांची सुद्धा लवकरात लवकर सुरवात करावी. कोळीवाड्यांच्या विकासासंदर्भात सर्व विभागांची एकत्रित बैठक घ्यावी आणि यातील सर्व अडचणी दूर कराव्यात. रोजगार आणि स्वयंरोजगार या प्रकल्पांची अंमलबजावणी करावी, आणि विविध पर्यटन स्थळावर पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यात.

–मुंबईत उभारणार फिरती आरोग्य तपासणी केंद्रे
बैठकीदरम्यान विकासांच्या कामासोबतच सोबतच मुंबईतील नागरिकांसाठी फिरती आरोग्य तपासणी केंद्रे उभारणार असल्याचे केसरकरांनी सांगितले. मुंबईतील नागरिक निरोगी राहावेत यासाठी हे फिरती तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहेत, असे ही मंत्री केसरक म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Bollywood : अटल बिहारींची भूमिका साकारणार पंकज त्रिपाठी; रवी जाधव करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

Bharat Jodo Yatra : ‘सावरकरांबद्दल काँग्रेस-सेनेची मते वेगळी पण…’ जयराम रमेश यांचे विधान

MNS Against Rahul Gandhi : राहूल गांधींच्या विरोधात मनसे आक्रमक; पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतले

— मुंबईत आयोजित होणार रोजगार मेळावा
मुंबईत लवकरच रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे, असे बैठकीदरम्यान केसरकरांनी सांगितले. आणि याबाबत आढावा घेऊन महिलांसाठी स्वयंरोजगाराचे पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
अग्निशामक आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला बैठक घेण्याचे आदेश
उंच इमारतींमध्ये आग लागणे या सारख्या घटना टाळण्यासाठी मुख्य अग्निशामक अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांची बैठक घेऊन त्यांना अशा परिस्थितीवर उपाययोजना कराव्यात असेही निर्देश या वेळी केसरकरांकडून देण्यात आले. पर्यटना विषयी बोलताना त्यांनी काळा घोडा, बानगंगा, कोळीवाडी येथील पर्यटन महोत्सवाच्या धर्तीवर कार्यक्रम आयोजित करण्यासही त्यांनी सांगितले आहे.

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago