भाजप नेत्यांनी विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाणांचा उदो उदो करावा, देवेंद्र फडणविसांचा काहीच संबंध नाही !

टीम लय भारी

मुंबई : खोटं बोल पण रेटून बोल हे भाजप नेत्यांचे वैशिष्ट्य आहे. पण खोटं बोलताना भाजप नेते अनेकदा स्वतःच्याच हाताने स्वतःचे पितळ उघडे पाडून घेतात. याचे मूर्तिमंत उदाहरण समोर आले आहे. ‘मेट्रो-७ व मेट्रो-२’ प्रकल्पाचा आरंभ सोहळा शनिवारी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे.

या सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis is not invited) यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजप नेत्यांचा तिळपापड झाला आहे. (Metro inauguration credit goes to bjp?)

‘देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच मेट्रो प्रकल्प सुरू झाले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis is not invited) हेच खरे मेट्रोचे शिल्पकार आहेत’, असे भासवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाला आहे. चित्रा वाघ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेही फडणवीस यांना ‘मेट्रोचे शिल्पकार’ बनविणारी लोणकढी थाप मारली आहे.
वास्तवात मात्र मुंबईतील ‘मेट्रो रेल्वे’ हे नाव जरी घेतले तरी स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे नाव नजरेसमोर लगेच उभे राहते. मुंबई आणि महाराष्ट्रात आता मेट्रो रेल्वे हात पाय पसरू लागल्या आहेत, त्याचे खरे श्रेय स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे आहे.

मुंबई व परिसरातील वाहतुकीचे मोठे प्रकल्प वेगाने मार्गी लागावेत यासाठी विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना ‘मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणा’ची स्थापना केली होती. त्याअंतर्गत ‘एमयुटीपी’ उपक्रम सुद्धा हाती घेण्यात आला होता. ‘मुंबई रेल्वे विकास मंडळ’ हा सुद्धा विलासराव देशमुख यांच्याच दूरदृष्टीचा परिणाम होता.
मुंबईचे रस्ते ऐसपैस झाले. बेस्टच्या ताप्यात आकर्षक व आरामदायी बसेस आल्या. रेल्वे ट्रॅकवर देखण्या गाड्या धावू लागल्या, आणि महत्वाचे म्हणजे मेट्रोचे अनेक मार्ग वेगाने वळणे घेत पुढे जाऊ लागले.

विलासराव देशमुख यांनी त्यावेळी धोरण आखले आणि त्याची कठोर अंमलबजावणी केली. त्याची फळे आता पाहायला मिळत आहेत. मुंबईत सध्या घाटकोपर ते वर्सोवा या एकमेव मेट्रो मार्गावर गाड्या धावत आहेत. त्या धावायला सुरूवात झाली होती, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis is not invited) हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. परंतु त्यांच्या काळात मुंबईत एकाही नवीन मार्गावर मेट्रो धावली नाही. मेट्रोचे अनेक प्रकल्प विलासराव देशमुख यांनी हाती घेतले. नंतर आलेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी ती संख्या वाढवत नेली.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis is not invited) यांनीही त्यांच्या कार्यकाळात काही मार्ग वाढविले. विलासराव देशमुख यांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे काम अन्य मुख्यमंत्र्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनीही केले असे म्हणता येईल. देवेंद्र फडणवीस यांच्या ठिकाणी येडागबाळा माणूस जरी मुख्यमंत्री झाला असता तरी ते काम कमी अधिक प्रमाणात सुरूच राहिले असते.

परंतु देवेंद्र फडणविसांनाच ‘मेट्रोचे शिल्पकार’ (Devendra Fadnavis is not invited) संबोधणे हे हास्यास्पद असल्याची भावना जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुध्दा वाचा :

PM inaugurates Pune Metro, claims projects never saw light of day during erstwhile governments

भाजपचा कुणी नेता महिलांना कमी लेखतो, तर कुणी दलित – झोपडपट्टीवासियांची थट्टा करतो

 

Jyoti Khot

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

7 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

9 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

9 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

10 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

11 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

12 hours ago