टीम लय भारी
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लोकायुक्तांकडे याचिका दाखल केली आहे.
अनिल परब यांनी अनधिकृतपणे म्हाडाची जागा बळकावली आणि या जागेवर त्यांनी अनधिकृत बांधकाम केले, असे सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. “शिवसेना मंत्री अनिल परब यांनी सरकारची/म्हाडाची जागा बळकावणे व अनधिकृत बांधकाम केल्याच्या विरोधात मी लोकायुक्तांकडे याचिका दाखल केली”, अशी माहिती सोमय्या यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
किरीट सोमय्या गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या काही नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. आपण ठाकरे सरकारच्या तीन विकेट पाडणार, असेही सोमय्या यांनी अलिकडेच म्हटले होते. त्यामुळे आता अनिल परब सोमय्यांच्या आरोपांना काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…