महाराष्ट्र

उदयनराजेंचे ट्विट पाहिलंत का? “आमचे बंधूराज…” म्हणत शिवेंद्रराजेंसोबत फोटो केला शेअर

टीम लय भारी

मुंबई :-  भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसानिमित्त ट्विट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सातारा-जावळीचे भाजप आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आज वाढदिवस. ट्विटरच्या माध्यमातून उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

“आमचे बंधुराज सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना.” असे लिहित उदयनराजेंनी दोघांचा फोटोही शेअर केला आहे.

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले कोण आहेत ?

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर २००४ पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर २०१९  मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपप्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

शिवेंद्रराजे आणि उदयनराजे हे चुलतबंधू. परंतु गेल्या काही काळात दोघांमध्येही विस्तव जात नव्हता. आधी दोघे ही राष्ट्रवादीत होते, नंतर दोघे ही भाजपात गेले. त्यामुळे मूळचे राष्ट्रवादीचे असलेले दोन्ही राजे सध्या भाजपमध्ये आहेत. भाजपप्रवेशाच्या वेळी दोन्ही राजेंचे मनोमीलन झाल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रवादीत घरवापीची ऑफर

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नुकतीच शिवेंद्रराजे भोसलेंना एक ऑफर ही दिली होती. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे पुन्हा राष्ट्रवादीत आले तर ते नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व करतील, अशी ऑफर शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसलेंना दिली होती.

उदयनराजेंची ही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी पूर्वी शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली. तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडून आलेले खासदार उदयनराजे भोसले यांनीही खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. १४ सप्टेंबर २०१९ रोजी उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. त्यानंतर भाजपने उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवले.

Rasika Jadhav

Recent Posts

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

39 mins ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

1 hour ago

महाराष्ट्रात मराठी माणसालाच No Welcome

जान्हवी सराना या एचआर मॅनेजरने अलीकडे लिंक्डिनवर पोस्ट केलेल्या नोकरी भरतीच्या जाहीरातीवरून सोशल मिडियावर चांगलीच…

2 hours ago

‘जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं’: शांतीगिरी महाराज

नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारीचा आजचा शेवटचा दिवस असून महायुतीला स्वामी शांतीगिरी महाराजांचे (Shantigiri Maharaj)…

3 hours ago

ICICI होम फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा, २२२ खातेदारांच्या लॉकरमधून ५ कोटींचे दागिने लंपास

नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्स या कंपनीच्या कार्यालयातील (ICICI Home Finance office raided) तब्बल पाच कोटींचे…

3 hours ago

तापमानाचा पारा पुन्हा वाढणार : उष्णतेच्या लाटेचा इशारा

हवामान खात्याने देशातील सात राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा ( Heat wave warning) आहे त्यामुळे पुन्हा…

3 hours ago