Categories: मुंबई

‘मातोश्री’ अडचणीत, महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार!

मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंच्या जीवालाही धोका, आमदार रवी राणा यांचा दावा

टीम लय भारी

मुंबई : सचिन वाझे यांच्या अटकेमुळे ‘मातोश्री’च्या अडचणीत वाढ झाली आहे. ज्याप्रकारे मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्याप्रमाणे सचिन वाझे यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी भाजपा आमदार रवी राणा यांनी केली आहे. तसेच या प्रकरणामुळे महाराष्ट्र सरकार अडचणीत येणार असून आगामी काळात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा रवी राणा यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.

“देवेंद्र फडणवीस हे याआधी मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र, त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे आता सचिन वाझे यांचीही हत्या केली जाण्याची शक्यता आहे,” असा दावाही रवी राणा यांनी केला आहे.

अटकेत असलेल्या सचिन वाझेंच्या एनआयए चौकशीमुळे ‘मातोश्री’ अडचणीत आले आहे. त्यामुळे मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंचीही हत्या होऊ शकते, अशी भीती आमदार राणा यांनी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले की, “सचिन वाझेंनी तपासात एनआयएला जी माहिती दिली आहे त्यावरुन महाराष्ट्रात येणा-या काळात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो. फक्त परमबीर सिंग यांना बाजूला करुन हे प्रकरण संपणारं नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभोवती फिरत आहेत. सचिन वाझेंना प्लानिंग करण्यासाठी कोणी मदत केली हेदेखील लवकरच पुढे येईल”.

“ज्याप्रकारे हिरेन यांचा मृत्यू झाला त्यानुसार सचिन वाझे यांच्या जीवालाही धोका आहे. म्हणून मुंबई पोलिसांपासून त्यांना दूर ठेवलं पाहिजे. एनआयने पूर्ण लक्ष ठेवून संरक्षण दिलं पाहिजे,” अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

15 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

16 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago