मुंबई

महापौरांची मोठी घोषणा; आता ‘यांना’ मास्कची सक्ती नाही

टीम लय भारी

मुंबई : बऱ्याच दिवसांपासून मास्क वसूली प्रकरण सुरू आहे. बरेच जण या विरोधात आपले मत मांडत आहे. त्यामुळे आता मास्क कोण वापरणार व कोणाला मास्क वापरण्याची सक्ती हे स्पष्ट झाले आहे(Mayor’s big announcement; Partially mask compulsion is removed).

क्लीनअप मार्शलमार्फत नागरिकांकडून सुरू असलेल्या ‘वसुली’ प्रकरणी गंभीर दखल घेतली गेली आहे. याप्रकरणी लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.

महापौर असही म्हणाल्या, खासगी गाडीतून प्रवास करणाऱ्या कुटुंबीयांना मास्क हे सक्तीचे नाहीत, त्यामुळे अशा प्रवाशांवर कारवाई करू नये, असे निर्देश त्यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई- बेलापूर वॉटर टॅक्सी आणि बेलापूर जेटी चे उद्घाटन

संजय राऊताच्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन : अजित पवार

Mumbai mayor Kishori Pednekar hints at unlocking city by February-end as COVID cases dip

मात्र विनामास्क फिरणाऱ्या रहदारी नागरिकांना २०० रुपये दंड आकारण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. मात्र, क्लीनअप मार्शलमार्फत ठिकठिकाणी नागरिकांकडून विनापावती ‘चिरीमिरी’ घेतली जाते. तसेच पाणी पिण्यासाठी मास्क खाली घेतला असल्यासही दंडात्मक कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. याबाबतचे १६ फेब्रुवारीच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते , त्यानंतर आता यासंदर्भातील गंभीर दखल सुद्धा महापौरांनी घेतली आहे.

तसेच विनापावती ‘वसुली’ करणाऱ्या, तसेच नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या मार्शलच्या विरोधात पालिकेने दिलेल्या १८००२२१९१६ या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

3 hours ago

राज्य सरकार व BMC वरच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा: नाना पटोले

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी प्रशासन व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी…

4 hours ago

पाणी येत नाही, मग जलवाहिनी खराब झाली असेल ! महापालिका अधिकाऱ्यांकडून अजब सल्ले

आपल्याकडे पाणी (Water) येत नसेल तर आपली पाईपलाईन खराब झाली असेल नाहीतर आपलं पाणी (Water)…

4 hours ago

देशाला सुरक्षित, समृद्ध बनविण्याची क्षमता नसलेल्या राहुल गांधी यांना सत्तेपासून दूर ठेवा! अमित शाह

गेल्या दहा वर्षांची यशस्वी कारकीर्द आणि पुढील पंचवीस वर्षांच्या देशाच्या प्रगतीचा स्पष्ट आलेख असलेल्या भारतीय…

5 hours ago

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना भिडले एकटे मुकेश शहाणे ; पोलिसात गुन्हा दाखल

महायुतीची प्रचार रॅली महाविकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयात आली आणि दोन्ही बाजूने घोषणांची आतषबाजी झाल्याचे बघायला…

5 hours ago

पंतप्रधानांना सभेची जागा बदलावी लागली : रोहित पवारांचा आरोप

राज्यात यापूर्वी जे टप्पे झाले त्यामधे मतदान कमी झाल्याचे दिसते कारण भाजपचे मतदार बाहेर पडत…

5 hours ago