35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयसंजय राऊताच्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन : अजित पवार

संजय राऊताच्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन : अजित पवार

टीम लय भारी

मुंबई : मोठा गाजावाजा करून सोमवारी मुंबईमध्ये संजय राऊतांची पत्रकार परिषद पार पडली. मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली, मुंबईत बाहेरून देखील शिवसैनिकही आले होते. याच गर्दीवर आणि एकंदरीत संपुर्ण कार्यक्रमावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मत व्यक्त केले आहे(Sanjay Raut’s press conference, Violation of corona rules : Ajit Pawar).

पवार म्हणाले की, मी स्वतः मास्क लावतो. अनेकांच्या तोंडाला मास्क नाही, सामाजिक अंतर नाही कोरोना नियमांचा फज्जा उडालेला दिसला. मी शिवसैनिकांची ही गर्दी कोरोना रुग्ण संख्येला वाढवणारी होती. मुख्यमंत्री देखील नियमावली पाळतात. सगळ्यांनी जबाबदारी योग्य पार पाडावी. काल गर्दी झाली असे गालबोट कधीतरी लागत असते.

मास्क काढून भाषण केलेले कधी पाहिले आहे का? असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा

संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताच भ्रष्टाचार नाहीय! अजित पवारांचं किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर

वाईन आणि दारू यात फरक असतो; अजित पवारांचा भाजपवर निशाणा

Mumbai: Ajit Pawar praises Aaditya Thackeray’s development vision after visiting slew of projects in Worli and adjoining areas

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवला. तिन्ही पक्षात मतांतर होणार नाही याची काळजी घेतली जाते. मत स्वातंत्र्य असले तरीही ही महाराष्ट्राची परंपरा नाही. यापूर्वीही सरकार वेगवेगळी आली. एकाचे चुकले तर दुसऱ्यांने थांबले पाहिजे पण तसं होत नाही असंही ते म्हणाले आहेत. महाराष्ट्राला न शोभणारी वक्तव्य केली जात आहेत, असेही अजित पवार म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी