मुंबई

उत्सवी राजा तळमळे प्रजा :  संजय  राऊत

टीम लय भारी

मुंबई: काश्मिरी पंडितांवरील हल्लासत्रावरुन शिवसेने भाजपावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत (sanjay raut) यांनी सामानच्या अग्रलेखातून भाजपला खडेबोल सुनावले आहे. ज्ञानवापी मशीद, ताजमहालखालचे शिवलिंग शोधणारे, गोवंशहत्येसाठी झुंडबळी घेणारे सर्व नवहिंदुत्ववादी कश्मीरातील हिंदूंच्या हत्या आंधळे, बहिरे बनून पाहत आहेत. अशा वेळी पंडितांच्या समर्थनासाठी पुन्हा महाराष्ट्रातून गर्जना झाली आहे. sanjay raut on kashmir killings

“कश्मिरी पंडितांना महाराष्ट्र आधार देईल, काय हवे ते करेल” असा 56 इंच चा दिलदारपणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवून ‘महाराष्ट्र आधार या भारताचा आणि हिंदूंचा’ हेच सिद्ध केले. कश्मिरी प्रजा तळमळत आहे आणि राजा सत्तेचा आठवा उत्सव साजरा करीत आहे. महाराष्ट्राने पंडितांच्या बाह पसरले आहेत. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची हीच परंपरा आहे!

भारतीय जनता पक्ष एक अजब रसायन आहे. ही मंडळी एरवी राष्ट्रीय किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नरडी ताणून बोलत असतात, पण जेव्हा खरोखरच हिंदू संकटात येतो तेव्हा तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसलेले दिसतात, कश्मीर खोऱ्यांत हिंदू पंडितांच्या हत्यासत्रावर आणि पलायनावर भाजप व त्यांचे दिल्लीतील मालक तोंड दाबून बसले आहेत. मोदी सरकारचा आठवा वाढदिवस भाजपवाले देशभरात साजरा करीत आहेत, आठ वर्षाच्या कालखंडास उत्सवी स्वरूप दिले जात आहे. sanjay raut on kashmir killings

आठ वर्षांत फक्त मोदी सरकारने देशाचे कसे नंदनवन केले याचे दाखले दिले जात आहेत. कश्मीरातील 370 कलम हटवले,पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला, दहशतवादाचे कंबरडे मोडले वगैरे वगैरे सांगितले जात आहे, पण हे भजन-कीर्तन सुरू असताना क१ त्यांत लागलेल्या आगीचे चटके या उत्सवी लोकांना बसू नयेत याचे आश्चर्य वाटते.ज्या सर्जिकल स्ट्राइकचे कौतुक करत आहात, त्या स कल स्ट्राइकचे भांडवल करत मागची निवडणूक जिंकली, पण आज कश्मीरची स्थिती जास्तच बिघड आहेत.

हिंदूनी सामुदायिक पलायन  हिंदूच्या रक्त पाट वाहत आहेत. कश्मिरी पंडित मारले जात कश्मीरच्या रस्त्यावर उत पंडित मंडळी भाजपला शिव्याशाप देत आहेत. सत्तेचा आठवा वाढदिवस साजरा करणायांनी आता या पंडि नये म्हणाजे झाले. 24 तासात आम्हाला. ही किंवा पाकड्यांचे हस्तक नये म्हणजे झाले शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलंय.

“कश्मीरात हाहाकार माजला आहे. सरकारला वाटले, मोदी-शहा नामक जादूची छडी फिरताच कश्मीरातील अतिरेकी पळून जातील, पण उलटेच घडले. हिंदू जनताच कश्मीरमधून पळून जाताना दिसत आहे. मोदी-शहांच्या राज्यात कश्मीरातील हिंदूंना वाली कोण? त्यांचे रक्षण कोणी करायचे? मोदी व त्यांचे लोक ‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’, ‘द कश्मीर फाइल्स’, ‘पृथ्वीराज’ अशा सिनेमांच्या प्रसिद्धीतच अडकून पडले आहेत. sanjay raut on kashmir killings

हे ‘चमचेगिरी’छाप चित्रपट लोकांना दाखवून त्यांची मने भडकवायची, देशात नवा धर्मवाद निर्माण करायचा व मतांचा बाजार जिंकायचा, पण त्यामुळे कश्मीरातील हिंदूंना आधार मिळाला का, तर अजिबात नाही. हिंदूंना कवच देण्याऐवजी हिंदूंनी पळून जावे यासाठी सरकार भाड्याने ट्रक व बसची सुविधा पुरवत आहे. ३७० कलमही हटवले. पुढे काय वेगळे घडले?,” असा सवाल शिवसेनेनं केंद्र सरकारला विचारला आहे.

हे सुद्धा वाचा: 

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी

Next Maharashtra CM To Be From Sharad Pawar’s Party? NCP Leader Dhananjay Munde’s Big Claim

Shweta Chande

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

7 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

7 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

8 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

10 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

11 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

11 hours ago