मुंबई

जरांगे पाटलांनी फडणवीसांवर लावलेल्या आरोपांची SIT चौकशी करा: नाना पटोले

मराठा समाजाच्या आरक्षणावरुन सरकारने राज्यात वाद निर्माण केले आहेत, सरकारच समाजा-समाजात तेढ निर्माण करत आहे. मराठा समाजावरून राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण बिघडलेले आहे. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काय बोलणे झाले हे जाहीर करण्याची मागणी काँग्रेस सातत्याने करत आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांची एसआयटी मार्फत चर्चा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सरकारने आधी ७५ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या होत्या त्यानंतर ४० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आल्या आणि आता ८ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडलेली असते, दिवाळखोरी निघालेली असते त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवण्या मागण्या सादर केल्या जातात. या मागण्या कशासाठी आणल्या आहेत? आधीच्या पुरवणी मागण्यांच्या पैशांचे काय झाले? सरकारने २०० कोटी रुपये साखर कारखान्यांना दिले त्यानंतर पुन्हा ५०० कोटी साखर कारखान्यांना दिले. जनतेचे पैसे साखर कारखान्यांना दिले जात आहेत मग शेतकऱ्यांच्या वाट्याला किती पैसे गेले? किती शेतकऱ्यांना लाभ दिला,याची माहिती सरकारने दिली पाहिजे. पैसे कुठे गेले हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे, हा पैसा त्यांच्या घामाचा आहे. सरकारकडे पैसे नसल्याने कर्ज काढून सरकार चालवले जात आहे हे जनतेला सांगा व जनतेची माफी मागा.

विदर्भ मराठवाड्यासह काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, सर्वे कशाचा करता, तातडीने मदत करा. अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत द्या फक्त कारखानदारांचे खिसे भरु नका. रोज ८ शेतकरी आत्महत्या म्हणजे एका वर्षात २५०० शेतकरी आत्महत्या होत आहेत. २०१३-१८ दरम्यान मराठी शेतकऱ्यांच्या २८ टक्के आत्महत्या झाल्या तर २०१९ ते २०२४ मध्ये त्या ९४ टक्के झाल्या आहेत. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. जगणे कठीण झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हणून पुरवण्या मागण्यात ते मंजूर करून घेतले पण शेतकऱ्यांन ते पैसे मिळाले नाहीत. पुरवणी मागण्यातून घेतलेल्या एका एका पैशाचा हिशोब सरकारला द्यावा लागेल.

सरकार तरुणांच्या भविष्याशी खेळत आहे. नोकर भरती करत नाही, तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाला पण सरकार पुरावा मागत आहे, परिक्षांमध्ये कॉपी घोटाळा झाला, पेपर फुटले, अधिकारीच कॉपी पुरवत होतो हेही उघड झाले आहे. सरकार क़ॉपीबाज झाले आहे का? हा राजकारणाचा विषय नाही तर आम्ही जनभावना मांडत आहोत आणि सरकारला त्याचे उत्तर द्यावे लागेल, असे नाना पटोले म्हणाले.

टीम लय भारी

Recent Posts

विखेंच्या संस्थेतील उच्च शिक्षीत तरूणी म्हणते, डॉ. सुजय कुचकामी !

लय भारीचा नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे(Information about Vikhe Patil).…

45 mins ago

सुडबुद्धीचे राजकारण नाशिककर खपवून घेणार नाहीत- बडगुजर

राजाभाऊ वाजे (Rajabhau waje) यांना सर्व थरातून मिळत असलेला पाठिंबा बघता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू…

2 hours ago

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम समाजातील तिहेरी…

2 hours ago

कॉंग्रेसच्या विकासनितीमुळेच आमची प्रगती, तरीही आमच्या मुलाच्या डोक्यात मोदीप्रेम !

लय भारीचा शिर्डी मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. यादरम्यान मतदार संघातील मतदारांना भेटून…

2 hours ago

म्हशीच्या बाजारात निलेश लंकेंचा चाहता भेटला, विखे पितापुत्रांवर जाम संतापला !

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

3 hours ago

कट्टर हिंदू, मोदींचा २०१४ मधील भक्त, आता मोदींवर तोफा डागतोय

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

5 hours ago