मुंबई

ठाण्यात टीएमटीसेवा सक्षम करण्यासाठी आयुक्तांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

ठाणे महापालिकेकडून प्रवाशांच्या सोईसाठी चालवण्यात येणाऱ्या ठाणे परिवहन सेवा( टीएमटी) उपक्रमाच्या मालकीच्या अनेक जमिनी मोक्याच्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी या जमिनीचा विकास परिवहन विभागाच्या गरजा भागाविण्यासोबतच वाणिज्य पध्दतीने केला तर त्यातून कायमस्वरुपी मोठा उत्पन्न स्त्रोत निर्माण होवू शकेल, त्यासाठी आनंदनगर डेपोपासून सुरूवात करुन त्या जमिनीचा विकास करण्यासाठी ट्रान्झॅक्शन ॲडव्हायझर नियुक्त करण्यात यावेत व त्यांच्या माध्यमातून निविदा बनविण्याचे काम सुरू करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त
अभिजित बांगर यांनी बुधवारी आढावा बैठकीत दिले आहेत.

नव्वदच्या दशकात सुरू झालेल्या टीएमटीला ठाणे पालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे अनुदान देते. त्यातून कर्मचारी पगार आणि अन्य कामे टीएमटी करते. गेल्या अनेक वर्षापासून ही सेवा आर्थिक गैरव्यवहार, अनियमितता यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. १५ वर्षापूर्वी या सेवेचे विलनिकरण करण्याची टूम निघाली होती. पण ठाण्यातील काही वजनदार नेत्यांमुळे ते बारगळले होते. इतर महापालिकांच्या बसेस सेवानी टीएमटीचे अनेक मार्ग पळवले. प्रवासी पळवले. पण टीएमसी काही करू शकली नाही. या उलट पालिकेकडून दरवर्षी या सेवेला अनुदान मात्र मिळतच आहे.

तसेच नव्याने उपलब्ध होणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसच्या पुरवठा कामात विलंब होत असल्याबाबत संबंधित ठेकेदारास नोटीस बजावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. परिवहन सेवा ठाणेकरांची जीवनवाहिनी आहे, ही बससेवा केवळ ठाणे शहरापुरतीच मर्यादित न राहता बोरिवली, मीरारोड, भिवंडी, मुलुंड, कल्याण आदी भागात पोहचली आहे. तसेच आरामदायी प्रवासासाठी परिवहनच्या ताफ्यात वातानुकूलित बसेस देखील धावत आहेत.

परिवहन सेवेच्या माध्यमातून सद्यस्थितीत सुरू असलेले मार्गावरील बसफेऱ्यांची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली. ज्या मार्गावर बसेस धावत आहेत त्याचा संपूर्ण आढावा घेवून गर्दीच्या वेळी जास्तीत जास्त उपलब्ध होवून प्रवाशांचा खोळंबा होणार नाही व प्रवाशी परिवहनच्या बसेसला प्राधान्य देतील या दृष्टीने संपूर्ण सर्व्हेक्षण करुन आवश्यक ते बदल व उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना आयुक्त  बांगर यांनी दिल्या.

पर्यावरणपूरक म्हणून परिवहन सेवेने इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून सदर कामाचा ठेका ओलेक्ट्रा या कंपनीस देण्यात आला आहे. यामध्ये एकूण 123 बसेसचा समावेश असून आजवर केवळ 13 बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. परंतु उर्वरित एकूण 110 बसेस पुरवठ्याबाबत संबंधित ठेकेदारांकडून विलंब होत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त संबंधित ठेकेदारास करारनाम्याप्रमाणे दंड लावण्यात यावा, तसेच त्यानंतरही वेळेत बसेसचा पुरवठा केला नाही तर भविष्यातील निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यापासून प्रतिबंधित का करु नये याचा खुलासा मागवून घ्यावा व आवश्यकता पडल्यास ही कार्यवाही कायम करावी अशा सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या.

तसेच परिवहनमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजना व बदलाबाबत वेगवेगळ्या ठिकाणी प्रवाशांची मते जाणून घ्यावीत जेणेकडून त्यांच्याकडून येणाऱ्या सुचनांनुसार आपल्याला कोणते बदल करणे गरजेचे आहे हे समजू शकेल व त्याप्रमाणे आपण बदल करु असेही त्यांनी या बैठकीत नमूद केले.

जाहिरात निविदेला अल्प प्रतिसाद
बसेसच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी 11 वेळा निविदा मागवून देखील योग्य प्रतिसाद मिळाला नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे तरी याबाबत एनएमएमटी, बी.एस.टी यांच्या जाहिरातदारांशी तुलना करुन दर निश्चित करावेत व निविदा अधिक स्पर्धात्मक होईल अशा पध्दतीने अटी शर्थीमध्ये बदल करावा जेणेकरुन निविदा यशस्वी होवू शकेल अशाही सूचना या बैठकीत देण्यात आल्या. महापालिकेच्या आस्थापनेवर परिवहनकडून ज्या 56 चालकांची सेवा वर्ग करण्यात आली आहे, अशा वाहनचालकांची सेवा टप्याटप्याने पुन्हा परिवहन सेवेत दाखल करुन घ्यावे असेही निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले.

हे सुद्धा वाचा

जितेंद्र आव्हाडांचा ‘तो’ व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल केला; राष्ट्रवादीची कारवाईची मागणी

प्रतीक्षा संपली; उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार

वन विभागाने २० वर्ष अडवली वाडा-मनोर महामार्गाची वाट!

परिवहन सेवेत काम करताना दोन प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. परिवहन सेवेत अशा पध्दतीने सुधारणा कराव्यात की नागरिकांना सुखद अनुभव प्राप्त होईल. तसेच परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीकोनातूनही सकारात्मक कार्यवाही होईल्‍ या दृष्टीने कामकाज करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

घोडबंदररोड सारखे लांबपल्ल्याचे व गर्दीचे मार्ग या ठिकाणी बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात त्याचबरोबर नवीन येणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस प्राधान्याने उपलब्ध करुन द्याव्यात. परिवहन सेवा वापरणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून त्यांना येणाऱ्या अडचणी व उपक्रमाकडील त्यांच्या अपेक्षा याबाबत फीडबॅक घेवून त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव आपल्या सेवेत होईल याची दक्षता घ्यावी. महिलांना परिवहन सेवेचा लाभ विनासायास घेता येईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

 

विवेक कांबळे

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

19 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago